बेन स्टोक्सचे क्रिकेट मैदानावर दमदार पुनरागमन

वृत्तसंस्था
शुक्रवार, 6 जुलै 2018

इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने दुखापतीनंतर नाबाद 90 धावांची दमदार खेळी करत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले.  काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर विरुद्ध डरहॅम या सामन्यात डरहॅम जेट्सकडून खेळताना स्टोक्सने आठ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 90 धावा केल्या. 

 

लंडन : इंग्लंडचा अष्टपैलू बेन स्टोक्स याने दुखापतीनंतर नाबाद 90 धावांची दमदार खेळी करत क्रिकेटच्या मैदानावर पुनरागमन केले.  काउंटी क्रिकेटमधील यॉर्कशायर विरुद्ध डरहॅम या सामन्यात डरहॅम जेट्सकडून खेळताना स्टोक्सने आठ चौकार आणि पाच षटकारांसह नाबाद 90 धावा केल्या. 

पाकिस्तानविरुद्ध झालेल्या सामन्यात डाव्या पायाच्या स्नायूला दुखापत झाल्याने त्याला ऑस्ट्रेलियाविरुद्ध झालेल्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेला त्याला मुकावे लागले होते. तसेच सध्या सुरु असलेल्या इंग्लंड विरुद्ध भारत ट्वेंटी20 मालिकेतही त्याला विश्रांती देण्यात आली आहे. आपली तंदुरुस्ती सिद्ध करण्यासाठी स्टोक्स सध्या काउंटी क्रिकेटमध्ये खेळत आहे. गुरुवारी (ता. 5 जुलै) झालेल्या सामन्यात त्याने फक्त फलंदाजी केली. या सामन्यात तो फलंदाजीसाठी सलामीला आला. स्टोक्सने नाबाद 90 धावा करुनही डरहॅम जेट्स या सामन्यात पराभूत झाले.

स्टोक्सची ही दमदार खेळी पाहता तो तंदुरुस्त असल्याचे निश्चत आहे. त्यामुळे भारत विरुद्ध इंग्लंड एकदिवसीय मालिकेत संघात त्याचे पुनरागमन होण्याची दाट शक्यता आहे.   
 

Web Title: Ben Stokes smashes unbeaten ninety on return