लॉर्ड्सच्या साक्षीने 'त्या' दोघांची नवी इनिंग

वृत्तसंस्था
Saturday, 14 July 2018

मुलीने त्या मुलाला होकार दिल्यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यानेही टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले आहे. 

इंग्लंड : भारताचा इंग्लंड दौरा हा भारतीय खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी जेवढा अविस्मरणीय असेल कदाचित त्याहूनही जास्त अविस्मरणीय तो एका भारतीय जोडप्यासाठी असणार आहे. 

 

एकदिवसीय मालिकेतील भारत विरुद्ध इंग्लंड हा सामना सुरु असतानाच एका मुलाने आपल्या प्रेयसीला लॉर्ड्सवर उपस्थित सर्वांच्या साक्षीने प्रपोज केले. या क्षण कॅमेरात कैद झाला असून याचे फोटो आणि व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहेत. मुलीने त्या मुलाला होकार दिल्यानंतर भारताचा फिरकी गोलंदाज युझवेंद्र चहल यानेही टाळ्या वाजवून त्यांचे अभिनंदन केले आहे. 

जगभरातील अनेक खेळाडू आणि प्रेक्षकांसाठी लॉर्ड्सचे मैदान 'स्पेशल' आहे. या जोडप्यासाठीही आता लॉर्ड्स नेहमी 'स्पेशल' राहिल.     


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Boy proposes a Girl in middle of Eng vs Ind 2nd ODI