...आणि 'कॅप्टन कूल' धोनीचा संयम सुटला 

वृत्तसंस्था
Sunday, 13 May 2018

कितीही मोठे खेळाडू असलात तरी क्रिकेट हा शिक्षणाचा भाग आहे. अगोदरच्या अनुभवावरून तुम्ही त्याच त्याच चुका पुन्हा करायच्या नसतात. कालच्या सामन्यात वॉटसनने ओव्हर थ्रो केल्यामुळे चेन्नईचा पराभव झाला असे नाही तर ज्योस बटलरने केलेली जबरदस्त फलंदाजीही तेवढीच निर्णायक ठरली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानलाही बाद फेरी गाठण्यासाठी बळ मिळाले. आता याच राजस्थानचा उद्या मुंबईविरुद्ध सामना होत आहे. 

मुंबई - एक चेंडू शिल्लक असताना राजस्थान रॉयल्सने चेन्नई संघाचा पराभव केला आणि एरवी शांत असलेल्या महेंद्रसिंह धोनीने प्रथमच संयम गमावला. राजस्थानला विजयासाठी दोन धावांची गरज असताना बटलरने दोन धावा पूर्ण केल्या. त्या वेळी सीमारेषेवरून आलेला थ्रो धोनीने पकडला; परंतु तोपर्यंत त्याचा संयम तुटला होता. कारण धावचीत होण्याची शक्‍यता नसताना शेन वॉटसनने चेंडू फेकला आणि तो ओव्हर थ्रो गेला. परिणामी बटलरला दोन धावा काढता आल्या. वॉटसनने हा थ्रो केला नसता तर बटलरला एकच धाव मिळाली असती आणि शेवटच्या चेंडूसाठी दुसरा फलंदाज स्ट्राइकवर आला असता. त्या वेळी धावा समान झाल्या होत्या. त्याला धाव मिळाली नसती तर सुपर ओव्हरमध्ये सामना गेला असता आणि तेथे काहीही घडू शकले असते. 

वॉटसनच्या बाबतीतील गरज नसताना असा ओव्हर थ्रो करून संघाला अडचणीत आणण्याचा प्रकार पहिल्यांदाच घडलेला नाही. 2014 च्या आयपीएलमध्ये तो राजस्थान संघातून खेळत असताना मुंबई इंडियन्सविरुद्ध असाच ओव्हर थ्रो केला. अखेरच्या चेंडूवर आदित्य तरेने फॉक्‍नरला षटकार मारून मुंबईला सरासरी किंचितशी उंचावला आली आणि बाद फेरीत प्रवेश करता आला होता. त्या वेळी राजस्थानचा मेंटॉर असलेल्या आणि संयमी राहुल द्रविडचाही त्रागा झाला होता. त्या वेळी त्याने डोक्‍यावरची कॅप फेकली होती. 

कितीही मोठे खेळाडू असलात तरी क्रिकेट हा शिक्षणाचा भाग आहे. अगोदरच्या अनुभवावरून तुम्ही त्याच त्याच चुका पुन्हा करायच्या नसतात. कालच्या सामन्यात वॉटसनने ओव्हर थ्रो केल्यामुळे चेन्नईचा पराभव झाला असे नाही तर ज्योस बटलरने केलेली जबरदस्त फलंदाजीही तेवढीच निर्णायक ठरली. त्याच्या या खेळीमुळे राजस्थानलाही बाद फेरी गाठण्यासाठी बळ मिळाले. आता याच राजस्थानचा उद्या मुंबईविरुद्ध सामना होत आहे. 

राजस्थान आणि मुंबई या दोन्ही संघांचा आत्मविश्‍वास अगोदरच्या सामन्यातील विजयांमुळे वाढलेला आहे. मुंबईने कोलकातावर मोठा विजय मिळवला तर राजस्थानने यशस्वीपणे धावांचा पाठलाग केला. उद्या चेन्नईचा सामना बाद फेरी निश्‍चित केलेल्या हैदराबादविरुद्ध होणार आहे. धवनला सापडलेला सूर आणि विलिमसनची शानदार फलंदाजी यामुळे हैदराबादने मोठे आव्हान लीलया पार केले. त्यामुळे धोनीच्या गोलंदाजांना आपली कामगिरी उंचवावी लागणार आहे. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Captain Cool Dhonis patience was off