कॅप्टन कूलच्या निरोपाच्या लढतीत युवराज, नेहराकडेही लक्ष

सकाळ वृत्तसेवा
मंगळवार, 10 जानेवारी 2017

मुंबई - इंग्लंड आणि भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामन्यास अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकदिवसीय लढतीत महेंद्रसिंह धोनीची कर्णधार म्हणून ही अखेरची लढत असेल. त्यामुळे या सामन्याचे औत्सुक्‍य वाढले आहे. 

मुंबई - इंग्लंड आणि भारत ‘अ’ यांच्यातील सराव सामन्यास अचानक महत्त्व प्राप्त झाले आहे. एकदिवसीय लढतीत महेंद्रसिंह धोनीची कर्णधार म्हणून ही अखेरची लढत असेल. त्यामुळे या सामन्याचे औत्सुक्‍य वाढले आहे. 

भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांच्यासह सर्वच कार्यकारिणी सदस्य बडतर्फ झाल्यानंतरची ही भारतातील आंतरराष्ट्रीय संघाची पहिलीच लढत असेल. या लढतीच्या संयोजनास साह्य करू नका, असे सांगत सीसीआयवर दडपण आणण्याचाही प्रयत्न झाल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर उद्या (ता. १०) ही प्रकाशझोतातील लढत होईल. धोनीचा या सामन्याद्वारे भारतीय संघात आपण यष्टिरक्षक - फलंदाज म्हणून राहू शकतो, हे दाखवून देण्याचा प्रयत्न असेल. किंबहुना इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत त्याचा हाच प्रयत्न असेल. 

धोनीच्या एकदिवसीय नेतृत्वाची ही अखेरचीच लढत असेल; मात्र याच लढतीद्वारे युवराज सिंग आणि आशिष नेहरा भारतीय संघातील पुनरागमन सिद्ध करण्यास उत्सुक असतील. नेहरा यंदा एकही लढत खेळलेला नाही. तो मॅच फिटनेस सिद्ध करण्यास उत्सुक असेल. रणजी करंडक स्पर्धेतील चमकदार कामगिरीमुळे युवराजची निवड करण्यात आली आहे. युवराज, नेहरा, तसेच धोनीसाठी उद्याची लढत हा चांगला सराव असेल. शिखर धवन, हार्दिक पंड्या, अंबाती रायूदू, मोहित शर्मा हे सर्व धोनीच्या निरोपाची लढत गाजवण्यास उत्सुक असतील. 

इंग्लंड आणि संघातील बहुतेक खेळाडू मर्यादित षटकांच्या सरावात आहेत. त्याचबरोबर त्यांना ताकदवान भारतीय संघाबरोबर खेळण्याची संधी लाभली आहे. त्याचा अर्थातच ते फायदा घेतील.

Web Title: Captain Cool's messengers match Yuvraj, Nehra this regard