कर्णधार म्हणून धोनीच्या टी-२० मध्ये पाच हजार धावा

वृत्तसंस्था
शुक्रवार, 27 एप्रिल 2018

बंगळूर - ‘कॅप्टन कूल’ म्हणून धोनीने आयपीएलमधील गुरुवारी झालेल्या बंगळूरविरुद्धच्या सामन्यात आपली छाप पुन्हा एकदा पाडली. चेन्नईला विजय मिळवून देताना त्याने ३४ चेंडूंत नाबाद ७० धावांची खेळी करताना कर्णधार म्हणून टी-२० क्रिकेटमध्ये पाच हजार धावा करण्याची ऐतिहासिक कामगिरी केली. टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिला कर्णधार ठरला आहे. धोनीच्या आता टी-२० क्रिकेटमध्ये एकत्रित ५,७८६ धावा झाल्या असून, यातील ५,०१० धावा या कर्णधार असताना केलेल्या खेळीत केल्या आहेत.

Web Title: Captain Dhoni five thousand run in T20