कर्णधार कोहली, धोनीने दिली यो-यो चाचणी

पीटीआय
शुक्रवार, 15 जून 2018

भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी शुक्रवारी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेली यो-यो (सहनशीलता) चाचणी दिली. मात्र, त्यांच्या चाचणीचा अहवाल अजून प्रसिद्ध करण्यात आलेला आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर "बीसीसीआय'ने सर्व खेळाडूंना यो-यो चाचणी अनिवार्य केली आहे. कोहली सरावासाठी कौंटी क्रिकेट खेळणार होता. मात्र, मानेच्या दुखापतीमुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. संघातील अन्य खेळाडूंची यापूर्वीच अशी चाचणी झाली असून, आज कोहली, धोनी यांनी राष्ट्रीय क्रीडा अकादमीचे ट्रेनर शंकर बसू आणि अन्य सपोर्ट स्टाफसमोर ही चाचणी दिली. 

बंगळूर - भारताचा कर्णधार विराट कोहली आणि माजी कर्णधार महेंद्रसिंह धोनी यांनी शुक्रवारी "बीसीसीआय'ने अनिवार्य केलेली यो-यो (सहनशीलता) चाचणी दिली. मात्र, त्यांच्या चाचणीचा अहवाल अजून प्रसिद्ध करण्यात आलेला आगामी इंग्लंड दौऱ्याच्या पार्श्‍वभूमीवर "बीसीसीआय'ने सर्व खेळाडूंना यो-यो चाचणी अनिवार्य केली आहे. कोहली सरावासाठी कौंटी क्रिकेट खेळणार होता. मात्र, मानेच्या दुखापतीमुळे त्याला कौंटी क्रिकेटमधून माघार घ्यावी लागली. संघातील अन्य खेळाडूंची यापूर्वीच अशी चाचणी झाली असून, आज कोहली, धोनी यांनी राष्ट्रीय क्रीडा अकादमीचे ट्रेनर शंकर बसू आणि अन्य सपोर्ट स्टाफसमोर ही चाचणी दिली. 

या दोघांबरोबर सुरेश रैना, भुवनेश्‍वर कुमार आणि इंग्लंड दौऱ्यासाठी वगळण्यात आलेल्या केदार जाधव यांनीदेखील ही चाचणी दिली. कोहली आणि धोनी यांच्या चाचणीचा अहवाल अजून प्रसिद्ध केला नसला, तरी दोघांनी अगदी सहज चाचणी दिल्याचे सांगण्यात आले. मात्र, चाचणीनंतर कोहलीला चाचणीनंतर कोहली खांदा आणि पाठदुखी जाणवत असल्याचे समजते. 

भारतीय संघ व्यवस्थापनाने या चाचणीसाठी सुरक्षा अधिकाऱ्यांना पत्रकारांना दूर ठेवण्याचे आदेश दिले होते. भारताचा इंग्लंड दौरा 3 जुलैपासून सुरू होणार आहे.

Web Title: Captain Kohli and Dhoni gave the Yo Yo test