धोनीने मॅचसाठी 13 वर्षांनी केला रेल्वेप्रवास

वृत्तसंस्था
बुधवार, 22 फेब्रुवारी 2017

धोनीचा समावेश आणि आक्रमक इशान किशन तसेच, फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम यांच्यामुळे झारखंडची ताकद आता वाढली आहे. त्याचबरोबर वरुण ऍरॉनला संघात स्थान मिळाले आहे. पंजाब संघात हरभजनच्या नेतृत्वाखाली युवराज, मनदीप, मनप्रीत अशा खेळाडूंचा समावेश आहे. 

कोलकता - आयपीएलमधील रायझिंग पुणे सुपरजायंट्स संघाच्या कर्णधारपदावरून हकालपट्टी झाल्यानंतर महेंद्रसिंह धोनीने विजय हजारे करंडकातील सामन्यासाठी तब्बल 13 वर्षांनी रेल्वेचा प्रवास केला. 

आयपीएलमध्ये पुणे संघाने कर्णधारपद काढून घेतल्यानंतर महेंद्रसिंह धोनी आता देशांतर्गत विजय हजारे वन-डे क्रिकेट स्पर्धेसाठी झारखंडचे नेतृत्व करणार आहे. झारखंड आणि पंजाब यांच्यात 25 फेब्रुवारीला सामना होणार आहे. पंजाब संघाचे नेतृत्व भारतीय संघाचे दरवाजे बंद झालेला हरभजनसिंग करत आहे. धोनीने झारखंड संघातील सहकाऱ्यांसोबतचे छायाचित्र प्रसिद्ध केले आहे. त्यामुळे धोनी पुन्हा एकदा नेतृत्व करताना दिसणार आहे. 

रांचीहून रेल्वेतून निघालेला धोनी कोलकतातील हावडा स्टेशनवर पोहचल्यानंतर त्याला पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी झाली होती. धोनीने प्रवास करण्यापूर्वी ट्विट केले होते, की 13 वर्षांनी मी रेल्वेने प्रवास करत आहे. प्रवास मोठा असला तरी संघातील खेळाडू सोबत असल्याने चर्चा करण्यास वेळ मिळेल.

धोनीचा समावेश आणि आक्रमक इशान किशन तसेच, फिरकी गोलंदाज शाहबाझ नदीम यांच्यामुळे झारखंडची ताकद आता वाढली आहे. त्याचबरोबर वरुण ऍरॉनला संघात स्थान मिळाले आहे. पंजाब संघात हरभजनच्या नेतृत्वाखाली युवराज, मनदीप, मनप्रीत अशा खेळाडूंचा समावेश आहे. 

संघ पुढीलप्रमाणे -
झारखंड संघ -
महेंद्रसिंह धोनी (कर्णधार), इशान किशन, इशांक जग्गी, विराट सिंग, सौरभ तिवारी, कौशल सिंग, प्रत्युष सिंग, शाहबाज नदीम, सोनू कुमार सिंग, वरुण ऍरॉन, राहुल शुक्‍ला, अनुकूल रॉय, मोनू कुमार सिंग, जसकरण सिंग, आनंद सिंग, कुमार देवव्रत, एस. राठोड, विकास सिंग 

पंजाब - मानन व्होरा, शुभम गिल, जीवनज्योत सिंग, मनदीप सिंग, युवराज सिंग, गुरकिरत सिंग मान, गितांश खेरा, अभिषेक शर्मा, हरभजन सिंग (कर्णधार), मनप्रीत सिंग ग्रेवाल, सिद्धार्थ कौल, संदीप शर्मा, वरुण खन्ना, बाल्तेज सिंग, मयांक सिधाना, शरल लुंबा, शुबेक गिल.

Web Title: Captain MS Dhoni Joins Jharkhand Teammates on Train Ride