आता क्रिकेट संघ निवडीपूर्वी होणार प्रत्येक खेळाडूची तंदुरुस्ती चाचणी

वृत्तसंस्था
Wednesday, 20 June 2018

परदेश दौऱ्यावर प्रयाणापूर्वी दुखापतीमुळे खेळाडूंनी ऐनवेळी माघार घेण्याची नामुष्की टाळण्यासाठी आता संघ निवडीपूर्वीच संभाव्य खेळाडूंची तंदुरुस्त चाचणी घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघातून अनुक्रमे महम्मद शमी आणि अंबाती रायुडू "यो यो' चाणणीत तंदुरुस्त न ठरल्यांतर बीसीसीआयला जाग आली आहे. 

नवी दिल्ली - परदेश दौऱ्यावर प्रयाणापूर्वी दुखापतीमुळे खेळाडूंनी ऐनवेळी माघार घेण्याची नामुष्की टाळण्यासाठी आता संघ निवडीपूर्वीच संभाव्य खेळाडूंची तंदुरुस्त चाचणी घेण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. कसोटी आणि एकदिवसीय संघातून अनुक्रमे महम्मद शमी आणि अंबाती रायुडू "यो यो' चाणणीत तंदुरुस्त न ठरल्यांतर बीसीसीआयला जाग आली आहे. 

संजू सॅमसन या चाचणीत तंदुरुस्त न ठरलेला तिसरा खेळाडू ठरला आहे. इंग्लंड दौऱ्यावर संघ रवाना होण्यापूर्वी त्याला भारत "अ' संघातून माघार घ्यावी लागली. प्रशासकीय समिती, बीसीसीआयचे कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी, क्रिकेट ऑपरेशन्सचे व्यवस्थापक साबा करिम यांच्यात झालेल्या बैठकीत संघ निवडीपूर्वी प्रत्येक खेळाडूची तंदुरुस्ती चाचणी घेण्याचा निर्णय झाला. 

जे खेळाडू चाचणीत तंदुरुस्त ठरतील त्यांचीच निवड केली जाईल. इंग्लंड दौऱ्यासाठी संघ निवडीपूर्वी आयपीएल झाल्यामुळे यावेळी चाचणी घेणे शक्‍य झाले नाही, परंतु ही चूक परत होणार नाही, असे बीसीसीआयच्या एका पदाधिकाऱ्याने सांगितले. 

आयपीएलमधील विजेत्या चेन्नई सुपर किंग्ज संघातील खेळाडू रायुडूच्या प्रभावशाली कामगिरीमुळे त्याची इंग्लंड दौऱ्यातील मर्यादित षटकांच्या खेळासाठी निवड करण्यात आली होती, परंतु तो तंदुरुस्त न ठरल्यामुळे सुरेश रैनाला संधी देण्यात आली. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CCI decides to conduct players’ fitness tests before selection for national team