'या' गोलंदाजाकडून बाद व्हायला आवडत नाही : विराट कोहली

सकाळ वृत्तसेवा
Monday, 13 January 2020

भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराच्या हातून बाद व्हायला आवडत नसल्याची प्रांजळ कबुली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली आहे.

नवी दिल्ली : भारतीय क्रिकेट संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रित बुमराच्या हातून बाद व्हायला आवडत नसल्याची प्रांजळ कबुली भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली याने दिली आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

जसप्रित बुमरा विराट कोहलीसाठी हुकमी गोलंदाज असला तरी नेटमध्ये या दोघांचे द्वंद रंगत असते आजही नेटमध्ये कोहली बुमारचे काही चेंडू स्टेडियममध्ये मारण्याचा प्रयत्न करत होता, पण एका चेंडूवर तो बाद झाला.

मोदींची तुलना शिवाजी महाराजांशी करणारे जय भगवान गोयल आहेत कोण?

कोहली म्हणाला, इतके वर्षे आम्ही एकत्र सराव करत आहोत पण या अगोदर मी नेटमध्ये त्याच्यासमोर केवळ दुसऱ्यांदा बाद झालो आहे या अगोदर अॅडलेटमध्ये बाद झालो होतो, पण आज ज्या चेंडूबवर बाद झालो तो आजचा सरावातील माझा अखेरचा चेंडू होता म्हणून बरे झाले नाहीतर पुढचा चेंडू टाकण्यासाठी बुमरा पुन्हा रनअपवर गेला होता, असे हसत हसत सांगणाऱ्या कोहलीने बुमराचे कौतूक केले.

उद्धवजी, राऊताच्या जिभेला लगाम घाला; संभाजीराजे आणि राऊत यांच्यात ट्विटरयुद्ध

तत्पूर्वी, कर्णधार म्हणून इतरांनाही सुसज्ज करणे हे माझे काम आहे. कोणत्याही क्रमांकावर खेळलो तरी माझ्या मनात असुरक्षिततेची भावना नाही, इतरांचा कदाचीत वेगळा दृष्टीकोन असू शकतो, असे स्पष्ट मत टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहलीने व्यक्त केले. इतरांना संधी देण्यासाठी आपण कोणत्याही क्रमांकावर फलंदाजी करण्यास तयार असल्याचे तो सांगत होता. ऑस्ट्रेलियाविरुद्ध उद्या होणाऱ्या एकदिवसीय सामन्यात रोहित-राहुल-धवन या तिघांना संधी देण्याचे जवळपास निश्चित आहे. विराटने तसे संकेतही दिले. त्यामुळे विराटला स्वतःचा क्रमांक बदलावा लागण्याची शक्यता आहे. या संदर्भात बोलताना विराटने प्रथम संघाचा विचार नंतर आपला असे स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenge myself to play well against Jasprit Bumrah says virat kohli