चेन्नईसमोर आव्हान भुवनेश्‍वर-रशीदचे 

वृत्तसंस्था
Tuesday, 22 May 2018

सुपर किंग्जची लोकप्रियता केवळ चेन्नईपुरती मर्यादित नसून देशभर त्यांचे उत्साही चाहते आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेल्या पाठिंब्यावरून हेच दिसून येते. चेन्नई हा काही बंगळूरप्रमाणे एखाद-दोन खेळाडूंभोवती केंद्रित झालेला संघ नाही. बंगळूरबाहेर केवळ विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे दोघेच लोकप्रिय आहेत.

चेन्नईने प्ले-ऑफमध्ये प्रवेश करणे अपेक्षित होते. खरे तर पूर्वीची कामगिरी पाहता त्यांनी आगेकूच केली नसती तर ते धक्कादायक ठरले असते. दिल्लीविरुद्ध हरणे त्यांच्यासाठी धोक्‍याचा इशारा ठरले. त्यामुळे गुणतक्‍त्यात अव्वल स्थान मिळविण्याची महत्त्वाकांक्षा त्यांना सोडून द्यावी लागली. त्या पराभवानंतर त्यांना पुन्हा विजयी फॉर्म मिळविणे आवश्‍यक होते आणि अखेरच्या लढतीत पंजाबला हरवून त्यांनी हेच साध्य केले. त्यांनी 18व्या षटकापूर्वी लक्ष्य गाठण्याचा प्रयत्न सुद्धा केला नाही. तसे केले असते तर त्यांना अव्वल स्थान मिळू शकले असते, पण त्यांना अतिरिक्त प्रयत्न प्ले-ऑफसाठी राखून ठेवायचे होते. 

सुपर किंग्जची लोकप्रियता केवळ चेन्नईपुरती मर्यादित नसून देशभर त्यांचे उत्साही चाहते आहेत. प्रत्येक ठिकाणी त्यांना मिळालेल्या पाठिंब्यावरून हेच दिसून येते. चेन्नई हा काही बंगळूरप्रमाणे एखाद-दोन खेळाडूंभोवती केंद्रित झालेला संघ नाही. बंगळूरबाहेर केवळ विराट कोहली आणि एबी डिव्हिलियर्स हे दोघेच लोकप्रिय आहेत. 

एखादा खेळाडू ठराविक वेळा चांगला खेळल्यानंतर अपयशी ठरतो असा एक नियम आहे. तो रायुडूच्या बाबतीत लागू पडला. अर्थात पंजाबविरुद्ध अपयशी ठरलेला रायुडू हैदराबादविरुद्ध पुन्हा चांगला खेळेल आणि या नियमाची किंमत हैदराबादला मोजावी लागू शकेल. वॉट्‌सनसुद्धा "ब्रेक'नंतर सज्ज झालेला असेल. हे दोघांनी संघाला चांगली सलामी दिली तर फॉर्मातील रैना आणि धोनी मैदानावर उतरून सुरवातीपासून टोलेबाजी करू शकतात.

चेन्नईला भुवनेश्‍वर आणि रशीद यांचा सामना करावा लागेल. या दोघांनी साखळीत चमकदार मारा केला आहे. सिद्धार्थ कौलचा टप्पा थोडा भरकटला आहे, कारण तो वेगाने चेंडू टाकण्याच्या प्रयत्नात आहे. हे फलंदाजांच्या पथ्यावर पडत असून ते वेगवान चेंडूला ताकदीने दिशा देत आहेत. धवनला पुन्हा फॉर्म गवसला आहे, तर विल्यम्सन याने आयपीएलमध्ये मोसमातील सर्वोत्तम कामगिरी केली आहे. मनीष पांडे आणि शकीबला निर्णायक टप्यासाठी खेळ उंचावणे आवश्‍यक आहे. 

हैदराबादने मागील तीन सामने गमावले आहेत. त्यामुळे त्यांची ताकद काहीशी कमी झाली आहे. चेन्नईला मात्र सावरण्यासाठी आवश्‍यक असलेला धक्का दिल्लीविरुद्ध बसला. 

या लढतीच्या निकालाचे भाकित वर्तविणे अवघड आहे. साखळीतील निकाल पाहता आणखी एक सामना अखेरच्या षटकात निकाली ठरेल. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Challenges in front of Chennai Bhuvaneswar and Rashid