श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत 

वृत्तसंस्था
मंगळवार, 13 जून 2017

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी मोक्‍याच्यावेळी श्रीलंकेस हादर दिले. महंमद आमीरने मोक्‍याच्यावेळी हादरे दिले आणि जुनैद खान तसेच हसन अलीने तळाचे फलंदाज आक्रमक होणार नाहीत, याची खबरदारी घेतली.

कार्डिफ - खराब क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजांचे उपलब्ध नसलेले पर्याय यामुळे श्रीलंकेला पाकिस्तानविरुद्धच्या निर्णायक साखळी लढतीत पराभव स्वीकारावा लागला. पाकिस्तानने संघर्षपूर्ण लढतीत तीन गडी राखून विजय मिळवत चॅंपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला. त्यांची गाठ आता बुधवारी (ता. 14) यजमान इंग्लंडशी पडेल. 

विजयासाठी जेमतेम सव्वादोनशेपेक्षा जास्त धावांचे लक्ष्य असलेल्या पाकला अझर अली आणि फखार झमन यांनी पाऊणशतकी सलामी करून दिली, त्या वेळी पाक विजय होणार असेच वाटत होते, पण बिनबाद 74 वरून पाकचा डाव पाहता पाहता 6 बाद 137 असा घसरला. याचवेळी सर्फराज अहमदने सूत्रे हाती घेतली. श्रीलंकेकडे चांगले गोलंदाज नाहीत, हे त्याने ओळखत तळाच्या फलंदाजांच्या साथीत चिवट प्रतिकार सुरू केला. त्याने महंमद आमीरसह आठव्या विकेटसाठी अर्धशतकी भागीदारी केली. त्या वेळी त्यांना सुटलेल्या झेलांचा तसेच खराब मैदानी क्षेत्ररक्षणाचा पुरेपूर फायदा झाला. श्रीलंकेने 23 (बाईज 4, वाईड 13) अवांतर धावा देत पाकच्या विजयास हातभारच लावला. 

पाकिस्तानच्या गोलंदाजांनी मोक्‍याच्यावेळी श्रीलंकेस हादर दिले. महंमद आमीरने मोक्‍याच्यावेळी हादरे दिले आणि जुनैद खान तसेच हसन अलीने तळाचे फलंदाज आक्रमक होणार नाहीत, याची खबरदारी घेतली. मात्र, पाक गोलंदाजांपेक्षा मोक्‍याच्यावेळी श्रीलंका क्षेत्ररक्षकांनी चुका करीत पराभव ओढवून घेतला. 

संक्षिप्त धावफलक 
श्रीलंका - 49.2 षटकात 236 (निरोशन डिकवेल्ला 73 - 86 चेंडूत 4 चौकार, कुशल मेंडिस 27, अँगेलो मॅथ्यूज 39, असेला गुणरत्ने 27, सूरंगा लकमल 26, महम्मद अमीर 10-53-2, जुनैद खान 10-0-40-3, फाहीम अश्रफ 6.2-0-37-2, हसन अली 10-0-43-3) पराजित वि. पाकिस्तान ः 44.5 षटकात 7 बाद 237 (अझर अली 34, फखार झमन 50 - 36 चेंडूत 8 चौकार व 1 षटकार, सर्फराज अहमद नाबाद 61 - 79 चेंडूत 5 चौकार, फाहीम अश्रफ 15, महम्मद आमीर नाबाद 28 - 43 चेंडूत 1 चौकार, लसीथ मलिंगा 9.5-2-52-1, एन प्रदीप 10-0-60-3) 

Web Title: Champions Trophy: Pakistan beat Sri Lanka to set up England semi-final