esakal | द. आफ्रिका क्रिकेटमध्ये संघव्यवस्थापक ताकदवान
sakal

बोलून बातमी शोधा

दक्षिण आफ्रिका क्रिकेट संघ
विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आता आपल्या संघाच्या स्वरूपात बदल करण्याचे ठरवले आहे. उच्चस्तरीय फुटबॉलच्या धर्तीवर आता सर्वाधिकार असलेले संघव्यवस्थापक सर्व काही ठरवणार आहेत.

द. आफ्रिका क्रिकेटमध्ये संघव्यवस्थापक ताकदवान

sakal_logo
By
वृत्तसंस्था

डर्बन : विश्वकरंडक क्रिकेट स्पर्धेतील अपयशी कामगिरीनंतर दक्षिण आफ्रिका क्रिकेटने आता आपल्या संघाच्या स्वरूपात बदल करण्याचे ठरवले आहे. उच्चस्तरीय फुटबॉलच्या धर्तीवर आता सर्वाधिकार असलेले संघव्यवस्थापक सर्व काही ठरवणार आहेत.

क्रिकेट दक्षिण आफ्रिकेने क्रिकेट संचालक आणि संघव्यवस्थापक या पदासाठी जाहिरात देत सध्याचे मार्गदर्शक ओटिस गिब्सन आणि त्यांच्या सहकाऱ्यांची कारकीर्द संपली असल्याचेच सांगितले. संघव्यवस्थापनाची कामगिरी फुटबॉलमधील व्यवस्थापकांसारखी असेल. ते कोचिंग स्टाफ, सपोर्ट स्टाफ तसेच कर्णधाराची निवड करतील. हे संघव्यवस्थापक क्रिकेट संचालकांनाच उत्तरदायी असतील. क्रिकेट संचालक हे क्रिकेटविषयक सर्व निर्णय घेतील. सध्या या पदावर कॉली व्हॅन झिल यांची तात्पुरती नियुक्ती झाली आहे.

आम्ही क्रिकेट दक्षिण आफ्रिकेतील बदलाचे निर्णय घाईघाईने घेतलेले नाहीत. खेळात जास्तीत जास्त व्यावसायिकता आणण्यासाठीच हे ठरवले आहे. त्याचबरोबर सर्व गोष्टीचा सारासार विचार करूनच सर्व काही ठरवले, असे क्रिकेट दक्षिण आफ्रिकेचे कार्यकारी आधिकारी थाबांग मॉरे यांनी सांगितले.

loading image