आव्हानाचा पाठलाग करण्याचा ‘ट्रेंड’ बदलतोय

सुनील गावसकर
मंगळवार, 17 एप्रिल 2018

गेल्या दोन सामन्यांपासून आव्हानाचा पाठलाग करून विजय मिळविण्याचा ‘ट्रेंड’ बदलत चालल्याचे दिसून येत आहे. आता प्रथम फलंदाजी करताना मोठी धावसंख्या उभारून संघ विजय मिळवत आहेत. 

चांगली सुरवात मिळाली, तर धावसंख्या दोनशे किंवा त्यापेक्षा अधिक नोंदवली जाऊ शकते आणि टी- २० मध्ये ही धावसंख्या नक्कीच पुरेशी ठरते. अशा वेळी आव्हानाचा पाठलाग करणाऱ्या संघासमोर सातत्याने दहापेक्षा अधिक धावगतीचे आव्हान उभे राहते आणि त्या दडपणाखाली खेळणे कठिण जाते. अशाही परिस्थितीत एकाहाती विजय मिळवून देणारे खेळाडू खूप थोडे आहेत. रविवारी धोनीने पंजाबविरुद्ध खेळताना असा प्रयत्न केला. पण, त्याचे प्रयत्न अपुरे पडले. 

या वेळी तीन सामन्यांनंतरही गुणांची पाटी कोरी असलेला मुंबई इंडियन्स हा एकमेव संघ आहे. सूर्यकुमार यादवला सलामीचा पाठविण्याची त्याची कल्पना चांगली आहे. इविन लुईस आणि ईशान किशनही झटपट धावा करत आहेत. पण, त्यांची मधली फळी अपयशी ठरत आहे. त्याचबरोबर गोलंदाजीत बदल करताना कर्णधार म्हणून रोहितला आक्रमकता दाखवावी लागेल. बंगळूरने रविवारी राजस्थानच्या आव्हानाचा चांगला पाठलाग केला. पण, कोहली आणि डिव्हिलर्स झटपट बाद झाल्यावर त्यांच्या आव्हानातील हवा निघून गेली. त्यांच्याकडे पहिले चार फलंदाज सर्वोत्तम आहेत. पण, अजून त्यांना म्हणावी तशी लय गवसलेली नाही. कोहली आणि डिव्हिलर्स दोघांनाही वानखेडेवर फलंदाजी करताना आवडते. उद्या या दोघांची फलंदाजी बहरली, तर मुंबईला गुणाचे खाते उघडण्यासाठी अजून थांबावे लागेल. (पीएमजी/ईएसपी)

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: changing trends in cricket