भन्नाट सूर गवसलेल्या चेन्नईसमोर कोलकात्याचे आव्हान 

वृत्तसंस्था
गुरुवार, 3 मे 2018

कोलकाता : यंदाच्या 'आयपीएल'च्या उत्तरार्ध सुरू होत असताना अनुभवी खेळाडूंचा भरणा असलेला चेन्नई सुपर किंग्जचा संघ बाद फेरीच्या उंबरठ्यावर उभा आहे. आतापर्यंतच्या आठ सामन्यांमध्ये मिळून चेन्नईने सर्वाधिक धावा केल्या आहेत. गुणतक्‍त्यात अव्वल क्रमांकावर असलेल्या चेन्नईची आजची लढत चौथ्या क्रमांकावरील कोलकाता नाईट रायडर्सशी होणार आहे. 

चेन्नई आणि कोलकता या दोन्ही संघांना 'डेथ ओव्हर्स'मधील गोलंदाजांचे अपयश सतावत आहे. ड्‌वेन ब्राव्हो हा चेन्नईचा 'डेथ ओव्हर्स'मधील तज्ज्ञ गोलंदाज आहे; पण गेल्या सामन्यात त्याने भरपूर धावा दिल्या होत्या. दुसरीकडे, कोलकाता नाईट रायडर्सची मदार नवोदित गोलंदाजांवर आहे. त्यामुळे शेवटच्या काही षटकांमध्ये आक्रमक फलंदाजांना वेसण घालण्यात त्यांना अपेक्षित यश येत नाही. 

ईडन गार्डन्सची खेळपट्टी फिरकी गोलंदाजांपेक्षा वेगवान गोलंदाजांना अधिक साह्य करत आहे. त्यामुळे चेन्नईच्या संघातील लुंगी एन्गिडीचा मारा निर्णायक ठरू शकतो. 

गुणतक्ता (दिल्ली विरुद्ध राजस्थान सामन्यानंतर) 
 
संघ सामने विजय पराभव गुण
चेन्नई सुपर किंग्ज 8 6 2 12
सनरायझर्स हैदराबाद 8 6 2 12
किंग्ज इलेव्हन पंजाब 7 5 2 10
कोलकाता नाईट रायडर्स 8 4 4 8
रॉयल चॅलेंजर्स बंगळूर 8 3 5 6
दिल्ली डेअरडेव्हिल्स 9 3 6 6
राजस्थान रॉयल्स 8 3 5 6
मुंबई इंडियन्स 8 2 6 4
Web Title: Chennai Super Kings to face Kolkata Knight Riders