इंग्लंड करणार फलंदाजी;इशांत,अमित मिश्रा संघात

वृत्तसंस्था
शुक्रवार, 16 डिसेंबर 2016

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून जलदगती गोलंदाज इशांत शर्मा व फिरकीपटू अमित मिश्रा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या संघामध्येही बदल करण्यात आले आहेत. ब्रिटीश अष्टपैलु खेळाडू लियाम डॉसन हा या सामन्यामधून पदार्पण करत आहे. 

चेन्नई - भारत व इंग्लंडमधील पाचव्या व अंतिम कसोटी सामन्यास आज (शुक्रवार) येथील एम ए चिदंबरम मैदानावर प्रारंभ झाला. इंग्लंडने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने याआधीच तीन कसोटी सामने जिंकून ही मालिका जिंकली आहे.

तमिळनाडूच्या लोकप्रिय मुख्यमंत्री जयललिता यांचे नुकतेच झालेले निधन आणि वरदाह या वादळाचा शहरास बसलेला फटका या पार्श्‍वभूमीवर या कसोटी सामन्याबद्दल प्रश्‍नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. मात्र त्यासंदर्भातील चर्चेस पूर्णविराम देत या सामन्यास प्रारंभ झाला आहे. चेन्नईमध्ये तब्बल एक वर्षानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळले जात आहे.

या सामन्यासाठी भारतीय संघात दोन बदल करण्यात आले असून जलदगती गोलंदाज इशांत शर्मा व फिरकीपटू अमित मिश्रा यांना संघात स्थान देण्यात आले आहे. इंग्लंडच्या संघामध्येही बदल करण्यात आले आहेत. ब्रिटीश अष्टपैलु खेळाडू लियाम डॉसन हा या सामन्यामधून पदार्पण करत आहे. याशिवाय, इंग्लंडचा वेगवान गोलंदाज स्ट्युअर्ट ब्रॉड यानेदेखील या सामन्यासाठी संघात पुनरागमन केले आहे.

भारतीय संघ असा - विराट कोहली (कर्णधार), रवीचंद्रन आश्‍विन (उप-कर्णधार), मुरली विजय, के एल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, मनीष पांडे, रवींद्र जडेजा, पार्थिव पटेल (यष्टिरक्षक), भुवनेश्‍वर कुमार, उमेश यादव, इशांत शर्मा आणि अमित मिश्रा

ब्रिटीश संघ असा- ऍलेस्टर कुक (कर्णधार), जो रूट, केटन जेनिंग्स, मोईन अली, जॉनी बेअरस्टोव्ह (यष्टिरक्षक), जेक बॉल, गॅरी बॅलन्स, गरेथ बॅटी, जोस बटलर, स्ट्युअर्ट ब्रॉड, स्टीव्हन फिन, लियाम डॉसन, बेन डकेट, जो रुट, बेन्स स्टोक्‍स आणि ख्रिस वोक्‍स

Web Title: Chennai Test: England wins toss, to bat