ट्‌वेंटी-20 स्पर्धेत पुजाराचे शतक

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 5 जानेवारी 2017

मुंबई - कसोटी स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराने डी. वाय. पाटील ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत 73 चेंडूंत शतक केले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारत इंडियन ऑइलला एअर इंडियाविरुद्ध 10 विकेट्‌सनी विजयी केले.

मुंबई - कसोटी स्पेशालिस्ट समजल्या जाणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराने डी. वाय. पाटील ट्‌वेंटी-20 क्रिकेट स्पर्धेत 73 चेंडूंत शतक केले. त्याने 14 चौकार आणि 2 षटकार मारत इंडियन ऑइलला एअर इंडियाविरुद्ध 10 विकेट्‌सनी विजयी केले.

पुजाराने रविकांत शुक्‍लासह 18.2 षटकांत 181 धावा केल्या. हार्दिक पंड्या आणि अबाती रायुदूच्या आक्रमक अर्धशतकामुळे रिलायन्स वनने 43 धावांनी विजय मिळविला. संक्षिप्त धावफलक - एअर इंडिया - 4 बाद 180 (मानविंदर बिस्ला 67, नमन ओझा 47, युवराज सिंग 43, गौरव यादव 38-2) पराभूत वि. इंडियन ऑइल - 18.2 षटकांत बिनबाद 181 (चेतेश्‍वर पुजारा नाबाद 108, रविकांत शुक्‍ला नाबाद 64). कॅग - 8 बाद 130 (बर्वेश शेट्टी 63, अंकुर जुल्का 30, सीपी शाहीद 8-2) वि. वि. स्टेट बॅंक ऑफ त्रावणकोर - 6 बाद 108 (राल्फ गोमेझ 29, फबीद फारुक नाबाद 26). जैन इरिगेशन - 7 बाद 165 (उर्वेश पटेल नाबाद 68, जय बिस्ता 37, विनित सिन्हा 34-2, प्रदीप दाढे 25-2, शशांक सिंग 24-2) पराभूत वि. डी. वाय. पाटील ब - 16.1 षटकांत 3 बाद 167 (शशांक सिंग नाबाद 82, सर्फराज खान नाबाद 21). रिलायन्स वन - 5 बाद 170 (हार्दिक पंड्या 95, अंबाती रायुदू 53, अमित मिश्रा 11-2, अली मुर्तझा 36-2) वि. वि. आरबीआय स्पोर्टस क्‍लब - 7 बाद 127 (कुमार देवरथ 29, सुमीत घाडीगावकर 27, कुलवंत सिंग 24-3, युझवेंद्र चाहल 19-2).


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cheteshwar pujara century in 20-20 cricket competition