पुजाराच्या झुंजार शतकाने भारताला आघाडी

Saturday, 1 September 2018

साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय फलंदाजांनी नाकारले. मोईन अलीने पाच भारतीय फलंदाजांना बाद करून मोठा धक्का दिला. भारताला 27 धावांची आघाडी मिळाली.

साऊदम्प्टन (लंडन) : जम बसवून बाद होण्याची वाईट सवय भारतीय संघाला चौथ्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात नडली. चिवट फलंदाजी करता प्रसिद्ध असलेल्या चेतेश्वर पुजारा नाबाद शतक (नाबाद 132) करूनही भारतीय संघाचा पहिला डाव 273 धावांवर आटोपला. पहिल्या डावात मोठी आघाडी घेण्याच्या सुवर्णसंधीला भारतीय फलंदाजांनी नाकारले. मोईन अलीने पाच भारतीय फलंदाजांना बाद करून मोठा धक्का दिला. भारताला 27 धावांची आघाडी मिळाली.

चहापानानंतर भारतीय फलंदाजांनी मोईन अलीच्या फिरकीला टाकलेली नांगी आश्चर्यकारक होती. चहापानानंतर लगेच हार्दिक पंड्याने बाद होण्याच्या सुरुवात केली. अश्विनने अत्यंत खराब फटका मारून विकेट मोईन अलीला बहाल केल्यावर पुढच्याच चेंडूवर शमी बोल्ड झाला. ईशांत शर्माने खंबीर फलंदाजी करणार्‍या पुजाराला थोडी साथ दिली. चेतेश्वर पुजाराने जणू आपल्याच सहकार्‍यांना कसोटी सामन्यात कशी फलंदाजी करायची असे हे दाखवून दिले. मोईन अलीला फटका मारून दोन धावा पळत पुजाराने 210 चेंडूत 11 चौकारांसह शतक साजरे केले. प्रथम ईशांत शर्मा आणि नंतर बुमरा बरोबर मिळून पुजाराने 78 धावा वाढवल्यानेच भारताला 27 धावांची माफक का होईना आघाडी पहिल्या डावात घेता आली. बुमराला बाद करून ब्रॉडने भारताचा डाव संपवला तेव्हा चेतेश्वर पुजाराच्या नावासमोर नाबाद 132 धावा दिसत होत्या.    

खेळपट्टीवर स्थिरावल्यावर बाद होण्याची भारतीय फलंदाजी खोडी चौथ्या कसोटीत पुन्हा एकदा दिसून आली. चिवट फलंदाजी करणाऱ्या चेतेश्‍वर पुजाराने एक बाजू लावून धरताना चौथ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी भारताचे आव्हान टिकवून ठेवले होते. अर्थात, सध्याची परिस्थिती सामन्यात दोन्ही संघांना समान संधीच दिसून येत आहे.

सलामीच्या जोडीपासून खेळपट्टीवर आलेल्या प्रत्येक भारतीय फलंदाजाने जम बसवायला कष्ट करून नंतर विकेट गमावून त्याच प्रयत्नांवर पाणी फिरवले. पुजारा टिकून असल्यामुळे तळातील फलंदाजांना हाताशी धरत भारताला आघाडी मिळविण्याच्या आशा कायम आहेत. 

दुसऱ्या दिवशीच्या खेळाला भारतीय सलामीवीरांनी झकास सुरवात केली. लोकेश राहुल आणि शिखर धवन यांच्या फलंदाजीत आत्मविश्‍वास होता. ही जोडी जमली असे वाटत असतानाच स्टुअर्ट ब्रॉडच्या चेंडूवर राहुल चकला आणि चेंडू पायावर आदळला. शिखर धवनला ब्रॉडने बऱ्याच वेळा अडचणीत टाकले. अखेर त्याच ब्रॉडने धवनला उजव्या स्टंप बाहेर जाणाऱ्या चेंडूवर झेल द्यायला भाग पाडले. 

कोहलीने मैदानात पाऊल ठेवल्यापासून विश्‍वासपूर्ण फलंदाजी केली. कडक ड्राइव्हज मारत कोहलीने 6 हजार कसोटी धावांचा टप्पा पार केला. समोरून खेळणाऱ्या पुजाराचा खेळपट्टीवर तंबू ठोकायचा इरादा पक्का दिसला. उपहाराला कोहली पुजारा जोडी खेळपट्टीवर टिकून राहिली. ज्यो रूटने फिरकी गोलंदाजांना चेंडू सोपवल्यावर कोहली - पुजाराने धावांचा वेग किंचित वाढवला. सगळे सुरळीत चालू असताना 46 धावांवर कोहलीने सॅम करनचा उजव्या स्टंपच्या बराच बाहेर असलेल्या चेंडूचा पाठलाग करताना स्लिपमधे कुककडे झेल दिला आणि जमलेली भागीदारी तुटली. या जोडीने 98 धावा जोडल्या. 

अजिंक्‍य रहाणेकडून पहिल्या डावात मोठ्या अपेक्षा होत्या. आश्‍वासक सुरवात करून रहाणेने विकेट गमावली. बेन स्टोकसचा चेंडू काहीसा पाय तिरका करत खेळताना रहाणे चुकला आणि चेंडू थाडकन पॅडवर आदळला. रिषभ पंत फलंदाजीला आल्यावर ज्यो रूटने फक्त वेगवान गोलंदाजांचा मारा चालू ठेवला.

रिषभ पंतचा लाजीरवाणा विक्रम

चेतेश्‍वर पुजाराने कसोटी क्रिकेटला साजेशी तंत्रशुद्ध संयमी फलंदाजी करून 70 धावा केल्याने भारताच्या पहिल्या डावात चांगली आघाडी घेण्याच्या आशा जिवंत राहिल्या. पंतसारख्या जातिवंत आक्रमक फलंदाजाला खाते उघडायला 29 चेंडूंचा सामना करूनही अपयश आले. चहापानाच्या अगोदरच्या षटकात मोईन अलीने त्याला पायचित केले. 

विराटला विक्रमानंतर मिळाले अनोखे सरप्राईज


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cheteshwar Pujara helps India to take important lead