मुरली विजय, चेतेश्‍वर पुजाराचे शतक; भारताची कडवी झुंज

वृत्तसंस्था
शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2016

राजकोट - इंग्लंविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उभारलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने चेतेश्‍वर पुजार आणि मुरली विजय यांच्या शतकासह 1 बाद 253 धावा केल्या आहेत.

राजकोट - इंग्लंविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने उभारलेल्या विशाल धावसंख्येचा पाठलाग करताना शेवटचे वृत्त हाती आले तेव्हा भारताने चेतेश्‍वर पुजार आणि मुरली विजय यांच्या शतकासह 1 बाद 253 धावा केल्या आहेत.

पहिल्याच कसोटी सामन्याच्या पहिल्या आणि दुसऱ्या दिवशी इंग्लंडच्या फलंदाजांचेच वर्चस्व पहायला मिळाले. ज्यो रूट पाठोपाठ मोईन अली आणि बेन स्टोक्‍स यांनी केलेल्या शतकांमुळे इंग्लंडने पहिला डावात 537 धावांचा डोंगर उभा केला होता. या धावसंख्येचा दबाव घेऊन फलंदाजीसाठी मैदानात भारतीय संघ उतरला होता. मात्र 72 चेंडूत 4 चौकारांच्या साहाय्याने केवळ 29 धावा करत आघाडीचा फलंदाज गौतम गंभीर बाद झाला आणि भारतीय संघाचा आत्मविश्‍वास काही अंशी ढासळण्याची शक्‍यता निर्माण झाली. मात्र मुरली विजय आणि चेतेश्‍वर पुजार यांनी संयमी खेळ करत आहेत. चेतेश्‍वर पुजाराने 16 चौकारांसह 105 धावा केल्या आहेत. तर मुरली विजयने 8 चौकार आणि 3 षटकारांसह 103 धावा केल्या आहेत. दोघांची जोडी मैदानावर स्थिरावली आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील सर्वोत्तम फलंदाज म्हणून विराट कोहलीशी रूटची तुलना केली जाते. त्याने पाच सामन्यांच्या मालिकेत पहिल्याच दिवशी इंग्लंडची पाळेमुळे घट्ट रोवली. सहजसुंदर फलंदाजी करत त्याने लीलया तीन अंकी धावसंख्या पार केली. त्यामुळे आता भारतीय चाहत्यांच्या विराटकडूनही अपेक्षा उंचावल्या आहेत.

Web Title: Cheteshwar Pujara, Murli Vijyas century