esakal | INDvsAUS : पुजारा द्विशतकाच्या जवळ; भारताची स्थिती भक्कम
sakal

बोलून बातमी शोधा

INDvsAUS : पुजारा द्विशतकाच्या जवळ; भारताची स्थिती भक्कम

INDvsAUS : पुजारा द्विशतकाच्या जवळ; भारताची स्थिती भक्कम

sakal_logo
By
टीम ई सकाळ

सिडनी : अॅडलेड, मेलबर्न आणि सिडनी तिन्ही कसोटी सामन्यांमध्ये शानदार शतक झळकाविणाऱ्या चेतेश्वर पुजाराने दुसऱ्या दुवसाच्या खेळाला सुरवात होताच दीडशे धावा पूर्ण केल्या.  कसोटी क्रिकेटमध्ये दीडशे धावा करण्याची ही त्याची सातवी वेळ आहे प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये त्याने 22 वेळा ही कामगिरी केली आहे. 

सिडनी क्रिकेट मैदानावर चौकारासह शतक पूर्ण करणाऱ्या पुजाराने दीडशे धावाही चौकार मारुन पूर्ण केल्या. पर्थच्या कसोटीत भारतीय संघाचा कर्दनकाळ ठरलेल्या नॅथन लायनला खणखणीत कव्हर ड्राईव्ह मारत त्याने दीडशे धावा पूर्ण केल्या. 

सिडनी क्रिकेट मैदानावर दीडशे धावा करणारा तो भारताचा केवळ पाचवा फलंदाज ठरला आहे. यापूर्वी सचिन तेंडुलकर, सुनाल गावसकर, रवी शास्त्री आणि व्हीव्हीएस लक्ष्मण यांनी ही कामगिरी केली आहे. 

पुजाराने दीडशे धावा पूर्ण केल्यावर चौथ्याच चेंडूवर हनुमा विहारी 42 धावांवर बाद झाला.

loading image