टी-20 क्रिकेटचा पहिला 'दस हजारी' 

वृत्तसंस्था
गुरुवार, 20 एप्रिल 2017

आयपीएलच्या नव्या मोसमात गेलची फटकेबाजी प्रथमच बघायला मिळाली. त्यानंतर गेलने स्वतःचे 'युनिव्हर्स बॉस' असे वर्णन करताना प्रतिस्पर्धी संघांना आपल्याला फॉर्म गवसल्याचा जणू इशाराच दिला. 

राजकोट : झटपट क्रिकेटमध्ये गोलंदाजांचा कर्दनकाळ समजल्या जाणाऱ्या ख्रिस गेलने टी-20 क्रिकेटमध्ये सर्वप्रथम दहा हजार धावा करण्याचा विक्रम केला. आयपीएलमध्ये मंगळवारी गुजरातविरुद्ध लौकिकास साजेशी फलंदाजी करताना त्याने ही कामगिरी केली. 

आयपीएलच्या नव्या मोसमात गेलची फटकेबाजी प्रथमच बघायला मिळाली. त्यानंतर गेलने स्वतःचे 'युनिव्हर्स बॉस' असे वर्णन करताना प्रतिस्पर्धी संघांना आपल्याला फॉर्म गवसल्याचा जणू इशाराच दिला. 

या सामन्याचा मानकरी ठरल्यावर गेल म्हणाला,''मी अजूनही विश्‍वविजेता आहे आणि जिवंत आहे. मला विश्‍वविजेता म्हणवून घ्यायला आवडते. टी 20 क्रिकेटमध्ये दहा हजार धावा करणे ही सोपी गोष्ट नाही. त्यासाठी दृढ निश्‍चय असायला हवा. माझ्यासाठी ही विशेष उपलब्धी आहे. चाहते खास करून माझा खेळ बघायला येतात ही भावना मला आनंद देणारी आहे.'' 

गेलची आकडेवारी 

  • 290 सामने
  • 10,074 धावा
  • 149.51 स्ट्राईक रेट
  • 18 शतके
  • 769 चौकार
  • 743 षटकार 

टी 20 कारकिर्दीमध्ये 
कालावधी डाव धावा स्ट्राईक रेट 
2011 पर्यंत
51 1379 134.79 
2011 ते 2015 7094 152.36 
2016 पासून 60 1601 151.18 

Web Title: Chris Gayle completes 10 thousand runs in T-20 cricket