क्‍लब क्रिकेटमधील खेळाडूंनी वापरला पाक संघाचा पोषाख

सकाळ वृत्तसेवा
बुधवार, 5 एप्रिल 2017

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील एका स्थानिक क्रिकेट क्‍लबने एका क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा पोषाख परिधान करून आणि सामन्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गावून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

नवी दिल्ली - काश्‍मीरमधील एका स्थानिक क्रिकेट क्‍लबने एका क्रिकेट स्पर्धेत पाकिस्तानी संघाचा पोषाख परिधान करून आणि सामन्यापूर्वी पाकिस्तानचे राष्ट्रगीत गावून नव्या वादाला तोंड फोडले आहे.

या संदर्भातील एक व्हिडियो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यावर संबंधित क्‍लबच्या भूमिकेवर जोरदार टीका करण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते चेनानी-नाशिरी बोगद्याचे उद्‌घाटन करण्यात आले. त्या वेळी मोदी यांना विरोध व्यक्त करण्यासाठी या क्‍लबने अशी कृती केल्याचे सांगितले जात आहे.

जम्मूमधील गंदरबल येथील मैदानावर हा सामना खेळवला गेला होता. या सामन्यातील एका संघाची जर्सी पांढरी होती, तर दुसऱ्या संघाने पाकिस्तानचे मौलवी बाबा दर्या उद दिन यांचे नाव लिहून पाकिस्तानी संघाची जर्सी परिधान केली होती. सामन्यापूर्वी आदर म्हणून पाकिस्तानचे राष्ट्रगीत गायले जाईल अशी थेट सूचनाच ध्वनिक्षेपकावरून देण्यात आली. मैदानाला लागूनच स्थानिक पोलिस ठाणे असल्यामुळे या सगळ्या प्रसंगाबद्दल आश्‍चर्य व्यक्त करण्यात येत आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे संबंधीत संघाने आपल्या कृतीचे समर्थन केले आहे. "आमचा संघ वेगळा दिसावा असे आम्हाला वाटत होते. आम्ही काश्‍मीरप्रश्‍न विसरलेलो नाही. त्यामुळे आमच्या भावना व्यक्त करण्यासाठी आम्ही ही कृती केली,' असे या संघाचे म्हणणे आहे.

Web Title: club cricket players used pakistan team clothing