प्रशासक समिती सदस्य बीसीसीआयला भेटणार

यूएनआय
मंगळवार, 4 एप्रिल 2017

नवी दिल्ली - भारतीय क्रिकेट नियामक मंडळावरील (बीसीसीआय) प्रशासक समिती "आयपीएल'च्या नव्या मोसमाला सुरवात होण्यापूर्वी 5 एप्रिलला हैदराबाद येथे "बीसीसीआय' पदाधिकाऱ्यांची भेट घेण्यात येणार आहे. प्रशासक समिती प्रमुख विनोद राय, विक्रम लिमये "आयपीएल'चे यशस्वी संयोजन व्हावे, यासाठी वरिष्ठ उपाध्यक्ष सी. के. खन्ना, सहसचिव अमिताभ चौधरी, खजिनदार अनिरुद्ध चौधरी यांच्याशी चर्चा करणार आहेत. या वेळी 9 एप्रिल रोजी होणाऱ्या विशेष सर्वसाधारण बैठकीबाबतदेखील चर्चा अपेक्षित आहे. एन. श्रीनिवासन यांनी "आयसीसी'वर "बीसीसीआय'चे प्रतिनिधी म्हणून जाण्याची इच्छा व्यक्त केली आहे. याच मुद्यावर या बैठकीत चर्चा होण्याची अधिक शक्‍यता आहे.
Web Title: Committee members meet BCCI administrator