दक्षिण आफ्रिकेविरुद्ध वर्चस्वाचा भारतीय महिलांचा पूर्ण निर्धार

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 8 जुलै 2017

भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद करत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सलग चार वेळा अपराजित राहत भारतीय महिला संघाने विजयी चौकार मारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय महिलांनी प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग चार सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

भारतीय महिला क्रिकेट संघाने कर्णधार मिताली राजच्या नेतृत्वाखाली श्रीलंकेला महिला विश्वकरंडक स्पर्धेच्या साखळी फेरीतच गारद करत इतिहास रचला आहे. या विजयासोबतच सलग चार वेळा अपराजित राहत भारतीय महिला संघाने विजयी चौकार मारला आहे. एवढेच नव्हे तर भारतीय महिलांनी प्रथमच विश्वकरंडक स्पर्धेत सलग चार सामने जिंकण्याची ऐतिहासिक कामगिरी केली आहे. 

भारतीय संघाने पहिल्या सामन्यात इंग्लंडला 35 धावांनी पराभूत केले तर दुसऱ्या सामन्यात वेस्ट इंडिजवर सात गडी राखून विजय मिळवला. भारतीय पुरुष संघाला चँपियन्स करंडक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पारंपारिक प्रतिस्पर्धी असलेल्या पाकिस्तानविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. भारतीय महिलांनी मात्र पाकिस्तान संघावर 95 धावांनी दणदणीत विजय मिळवला. आणि परवा श्रीलंकेविरुद्ध 16 धावांनी विजय मिळवत विश्वकरंडक स्पर्धेमध्ये सलग चार सामने जिंकून इतिहास रचला. श्रीलंकेविरुद्धच्या याच विजयामुळे भारतीय संघाने उपांत्यफेरीतील आपला प्रवेश जवळजवळ निश्चित केला आहे. 

भारतीय संघाने श्रीलंकेला 25 पैकी 24 सामन्यांत पराभूत करत आपले वर्चस्व सिद्ध केले. महिला एकदिवसीय क्रिकेटमधील ही सर्वोत्तम कामगिरी आहे. या कामगिरीत इंग्लंड दुसऱ्या स्थानावर आहे, त्यांनी आर्यलंडला 17 पैकी 16 सामन्यात पराभूत केले आहे. श्रीलंकेविरुद्ध सामन्यात सलामीचे फलंदाज लवकर बाद झाल्यावरही कर्णधार मिताली राज (53) आणि दिप्ती शर्मा (78) यांच्या संयमी फलंदाजीमुळे तसेच हरमनप्रित कौर (20) आणि वेदा क्रुष्णमुर्ती (29) यांनी सहाव्या विकेटसाठी केलेल्या अर्धशतकी भागीदारीच्या जोरावर भारताने श्रीलंकेसमोर 232 धावांचे आवाहन ठेवले. त्यानंतर झूलन गोस्वामी आणि पूनम यादव यांच्या गोलंदाजीमधील योगदानामुळे भारताने श्रीलंकेवर 16 धावंनी विजय मिळवला. 
भारताचा पुढील सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज होईल. 

गुणतक्त्यात प्रथम असलेल्या ऑस्ट्रेलिया संघाने एकही सामना पराभूत न होता उपांत्यफेरी गाठली आहे. दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आज होणाऱ्या सामन्यात विजय मिळवून उपांत्यफेरीतील आपले स्थान पक्के करण्याच्या निर्धारानेच भारतीय संघ मैदानात उतरेल. गुणतक्त्यात भारतीय संघ आठ गुणांसह दुसऱ्या स्थानावर आहे तर दक्षिण आफ्रिका सहा गुणांसह चौथ्या स्थानावर आहे. आज होण्याऱ्या सामन्याचा निकाल काहीही लागला तरी भारतीय संघाचे उपांत्यफेरीतील स्थान निश्चित असेल. 

तब्बल 42 वर्षानंतर भारताला सुवर्ण

विंबल्डन : फेडरर, थिएम, मिलॉसची आगेकूच

वर्ल्डकप फुटबॉल : भारताच्या गटात अमेरिका, कोलंबिया आणि घाना 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: The complete determination of Indian women to dominate South Africa