अफगाणिस्तानविरुद्ध अंजिक्य रहाणे कर्णधार

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 May 2018

बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अंबाती रायुडूला पुनरागमनाची संधी देण्यात आली; तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत असलेला सिद्धार्थ कौल हा नवा चेहरा असेल.

बंगळूर - भारतात आयपीएलचा धूमधडाका सुरू असताना पुढील महिन्यातील आंतरराष्ट्रीय क्रिकेट सामन्यांसाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. इंग्लंड दौऱ्यापूर्वीच्या सरावासाठी सरेकडून इंग्लिश कौंटी स्पर्धेत खेळण्यास विराट कोहली जाणार असल्यामुळे त्याच्या अनुपस्थितीत अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटी सामन्यात अजिंक्‍य रहाणे नेतृत्व करणार आहे. मर्यादित षटकांच्या मालिकांसाठी अंबाती रायुडूला पुनरागमनाची संधी देण्यात आली; तर आयपीएलमध्ये चमकदार कामगिरी करत असलेला सिद्धार्थ कौल हा नवा चेहरा असेल.

निवड समितीने आज एकाच बैठकीत पाच संघ (अफगाणिस्तानविरुद्धची कसोटी, आयर्लंडविरुद्धची ट्‌वेन्टी-२० मालिका, इंग्लंड दौऱ्यातील एकदिवसीय मालिका आणि इंग्लंडमधील तिरंगी मालिकेसाठी भारत ‘अ’ संघ) निवडले. या संघांमध्ये सर्व प्रमुख खेळाडूंना संधी देण्यात आली. आयपीएलमध्ये जखमी झालेला महाराष्ट्राचा केदार जाधव तंदुरुस्त नसल्यामुळे त्याचा विचार झालेला नाही.

रोहित कसोटीतून बाहेर
दक्षिण आफ्रिका दौऱ्यातील सुरवातीच्या कसोटी सामन्यात अजिंक्‍य रहाणेऐवजी पसंती देण्यात आलेल्या रोहित शर्माला अफगाणिस्तानविरुद्धच्या एकमेव कसोटीतून वगळण्यात आले. याच संघात करुण नायरला विराटच्या रिकाम्या झालेल्या जागेसाठी पुनरागमनाची संधी देण्यात आली. या जागेसाठी मुंबईच्या श्रेयस अय्यरचा विचार होईल, अशी चर्चा होती. पुढील आव्हानांचा विचार करून या संघातून भुवनेश्‍वर कुमारला विश्रांती देण्यात आली. या सामन्यासाठी रहाणे नेतृत्व करणार आहे; मात्र पुढील मर्यादित षटकांच्या सामन्यांसाठी त्याला संधी देण्यात आली नाही.

वर्ल्डकपची तयारी
इंग्लंडमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विश्‍वकरंडक स्पर्धेवर लक्ष ठेवून आता एकदिवसीय मालिकेसाठी संघ निवड करण्यात आली. यंदाच्या देशांतर्गत मोसमात नावालाच हजेरी लावलेला, परंतु आयपीएलमध्ये अधूनमधून ऑरेंज कॅप मिळवत असलेल्या रायुडूला पुनरागमनाची संधी देण्यात आली. त्याच्यासोबत मधल्या फळीसाठी श्रेयस अय्यरची निवड करण्यात आली. वेगवान गोलंदाजीत सिद्धार्थ कौल हा नवा चेहरा असणार आहे.

संघ
अफगाणिस्तानविरुद्धची एकमेव कसोटी - अजिंक्‍य रहाणे (कर्णधार), शिखर धवन, मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्‍वर पुजारा, करुण नायर, वृद्धिमन साहा, आर. अश्‍विन, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, उमेश यादव, महम्मद शमी, हार्दिक पंड्या, इशांत शर्मा आणि शार्दुल ठाकूर.

आयर्लंडविरुद्ध दोन ट्‌वेन्टी-२० 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, केएल राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.

इंग्लंडविरुद्ध एकदिवसीय मालिका 
विराट कोहली (कर्णधार), शिखर धवन, रोहित शर्मा, केएल राहुल, श्रेयस अय्यर, अंबाती रायुडू, महेंद्रसिंह धोनी, दिनेश कार्तिक, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, वॉशिंग्टन सुंदर, भुवनेश्‍वर कुमार, जसप्रीत बुमरा, हार्दिक पंड्या, सिद्धार्थ कौल आणि उमेश यादव.

इंग्लंडमधील तिरंगी मालिका, भारत ‘अ’ संघ 
श्रेयस अय्यर (कर्णधार), पृथ्वी शॉ, मयांक अगरवाल, शुबमान गिल, हनुमा विहारी, संजू सॅमसन, दीपक हुडा, रिषभ पंत, विजय शंकर, के. गौतम, अक्षर पटेल, कुणाल पंड्या, प्रसिद्ध कृष्णा, दीपक चहर, खलील अहमद आणि शार्दुल ठाकूर.

इंग्लंडमधील चार दिवसांचे सामने 
करुण नायर (कर्णधार), आर. समर्थ, मयांक अगरवाल, अभिमन्यू ईश्‍वरन, पृथ्वी शॉ, हनुमा विहारी, अंकित बावणे, विजय शंकर, केएस भारत, जयंत यादव, शहाबाझ नदीम, अंकित राजपूत, महंमद सिराज, नवदीप सैनी आणि रजनीश गुरबानी.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket ajinkya rahane captain afganisthan india