11 चेंडूंत त्यांनी गमाविले सात फलंदाज!!

वृत्तसंस्था
Tuesday, 26 June 2018

एकीकडे इंग्लंडचा आंतरराष्ट्रीय संघ धावांचा पाऊस पाडत असताना क्लब क्रिकेटच्या सामन्यात मात्र हाय वायकोंब या संघाचे अवघ्या 11 चेंडूंमध्ये सात फलंदाज माघारी परतले.  

इंग्लंडमध्ये सुरु असलेल्या ई. सी. बी नॅशनल क्लब चॅम्पियनशिप स्पर्धेत हाय वायकोंब आणि पीटरबोरो या क्लबमध्ये झालेल्या सामन्याने असे नाट्यमय वळण घेतले. हाय वायकोंबने 189 धावांचा पाठलाग करताना 186-3 अशी मजल मारली होती. जिंकण्यासाठी 12 चेंडूंमध्ये तीन धावांची गरज असताना त्यांचे सात फलंदाज बाद झाले आणि त्यांना अनपेक्षित पाराभवाला सामोरे जावो लागले. 

पीटरबोरो क्लबचा जलदगती गोलंदाज कायरन जोन्स याने टाकलेल्या षटकात त्याने एकही धाव न देता शेवटच्या चार चेंडूंमध्ये चार फलंदाज बाद केले. त्यामुळे वायकोंबला अखेरच्या षटकात 3 धावंचा गरज होती आणि त्यांच्या हातात तीन फलंदाज होते. 
अखेरचे षटक 16 वर्षीय फिरकी गोलंदाज दानियाल मलिक याने टाकले. या षटकातील पहिल्या चेंडूवर नाथान होक्सने एक धाव काढली. मात्र मलिकने पुढील तीन चेंडूवर तीन फलंदाज बाद करत पीटरबोरो संघाला स्पर्धेचे विजेतेपद मिळवून दिले. 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket club loses seven wickets in 11 balls