85 मीटरपेक्षा जास्त लांबीच्या सीमापार शॉटवर हवा अष्टकार - डीन जोन्स

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 27 May 2018

सिडनी - ‘टी-२० क्रिकेटमध्ये ८५ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या शॉटवर चेंडू सीमापार झाल्यास अष्टकार मिळायला हवा. आजच्या युगातील चाहत्यांसाठी हा खेळ आणखी अर्थपूर्ण होण्यासाठी नियमांमध्ये बदल होण्याची गरज आहे,’ अशी आग्रही सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स यांनी केली आहे.

सिडनी - ‘टी-२० क्रिकेटमध्ये ८५ मीटरपेक्षा जास्त लांबीच्या शॉटवर चेंडू सीमापार झाल्यास अष्टकार मिळायला हवा. आजच्या युगातील चाहत्यांसाठी हा खेळ आणखी अर्थपूर्ण होण्यासाठी नियमांमध्ये बदल होण्याची गरज आहे,’ अशी आग्रही सूचना ऑस्ट्रेलियाचे माजी कसोटीपटू डीन जोन्स यांनी केली आहे.

जोन्स यांनी वन-डे क्रिकेटमध्ये ‘स्ट्रोकप्लेयर’ म्हणून ठसा उमटविला होता. ते म्हणाले की, ‘कसोटी क्रिकेटवर अस्तित्वासाठी झगडण्याची वेळ आली आहे, कारण प्रेक्षक १२० चेंडूंच्या क्रिकेटकडे वळले आहेत. टी-२० मध्ये आणखी नावीन्य आणले पाहिजे. आपल्याकडे उत्तम तंत्रज्ञान उपलब्ध आहे. त्यामुळे ८५ मीटरपेक्षा जास्त लांब गेलेल्या प्रत्येक सीमापार शॉटवर आठ धावा मिळायल्या हव्यात. हा अतिरिक्त बोनस सुरू केल्यास फटकेबाज फलंदाज टी-२०ची रंगत आणखी वाढवतील.

इतिहासाचा दाखला
५७ वर्षांचे जोन्स विद्वान तसेच लोकप्रिय समालोचक आहेत. फलंदाजाने उत्तुंग फटका मारताच ते ‘गोईंग-गोईंग-गोईंग-गॉन’ असे शैलीत म्हणतात. त्यांचा क्रिकेटचा अभ्यास दांडगा आहे. इतिहासाचा दाखला देताना ते म्हणाले की, ‘मोठ्या शॉटवरील धावांचे प्रमाण काळाच्या ओघात बदलले आहे. १८७०च्या किंवा १८८०च्या दशकाच्या प्रारंभी चेंडू सीमारेषेवरून गेल्यास पाच धावा मिळायच्या. सहा धावांसाठी चेंडू थेट मैदानाबाहेर मारावा लागायचा. १८९८ मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ज्यो डार्लिंगने कसोटीतील पहिला षटकार मारला. १९१०च्या सुमारास नियम बदलला. चेंडू सीमारेषेवरून गेला तरी सहा धावा मिळू लागल्या. अशाप्रकारे खेळपट्टीच्या २२ यार्ड अंतराशिवाय खेळातील प्रत्येक नियमात बदल, सुधारणा झाली आहे.’

उत्तुंग शॉट मारणाऱ्या ख्रिस गेलसारख्या क्रीडापटूंवर प्रेक्षक कमालीचे प्रेम करतात. गोल्फमध्येसुद्धा ३५० मीटर अंतरापर्यंत शॉट मारणारे टायगर वूड्‌स, रॉरी मॅक्‌ईलरॉय यांच्यासारखे खेळाडू लाडके आहेत.
- डीन जोन्स

जोन्स यांच्या सूचनेविषयी आपल्याला काय वाटते ?   व्हा व्यक्त...
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket din jones