धोनी, पांड्याने लावली 100 मीटरची शर्यत, अन् जिंकले कोण?

वृत्तसंस्था
Wednesday, 13 December 2017

आज मात्र मैदानावर वेगळेच चित्र पहायला मिळाले. युवा हार्दिक पांड्या आणि तिशी पार केलेल्या महेंद्रसिंह धोनीने सरावादरम्यान धावता धावता चक्क 100 मीटरची शर्यतच लावली. अखेर अनुभवी धोनीने यात बाजी करत हार्दिकला मागे टाकले.

मोहाली - भारतीय संघावर श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत पिछाडीवर असल्याचे दडपण असले तरी खेळाडू सरावादरम्यान आनंद शोधण्याचा प्रयत्न करत असतात. असेच काही आज (बुधवाऱ) सरावादरम्यान हार्दिक पांड्या आणि महेंद्रसिंह धोनीने चक्क 100 मीटर धावण्याची शर्यत लावली अन् यात धोनीने बाजी मारली.

धरमशाला येथील एकदिवसीय सामन्यात भारतीय संघाला मानहानिकारक पराभवाला सामोरे जावे लागले होते. त्यामुळे तीन सामन्यांच्या मालिकेतील आजचा दुसरा सामना भारतासाठी जिंकणे अनिवार्य आहे. विराट कोहलीच्या जागी भारतीय संघाचे नेतृत्व करत असलेल्या रोहित शर्माच्या खांद्यावर संघाची धुरा आहे. भारतीय क्रिकेटपटू सरावादरम्यान कायम मौजमजा करताना दिसत असतात. कधी फुटबॉल खेळण्याचा आनंद लुटतात.

आज मात्र मैदानावर वेगळेच चित्र पहायला मिळाले. युवा हार्दिक पांड्या आणि तिशी पार केलेल्या महेंद्रसिंह धोनीने सरावादरम्यान धावता धावता चक्क 100 मीटरची शर्यतच लावली. अखेर अनुभवी धोनीने यात बाजी करत हार्दिकला मागे टाकले. दोघांमधील ही शर्यत खरंच धोनी अजूनही किती तंदुरुस्त आहे, याची साक्ष देणारी होती. हार्दिकही फार मागे नव्हता.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news 100 metre dash between Mahendra Singh Dhoni and Hardik Pandya