विराटचे पुन्हा शतक; भारताचा 5-1 ने मालिका विजय

Saturday, 17 February 2018

शार्दूलला ठाकूरने 4 फलंदाजांना बाद केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 204 धावांवर संपला. त्यानंतर भन्नाट फॉर्ममधे असलेल्या कर्णधार विराट कोहलीने 35 वे एकदिवसीय शतक ठोकून भारताला 8 गडी राखूनचा विजय मिळवून दिला. 6 सामन्यांची मालिका भारतीय संघाने 5-1 फरकाने जिंकून संपूर्ण वर्चस्व सिद्ध केले. विराट कोहली सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरला. 

सेंच्युरियन : शार्दूल ठाकूरचे चार बळी आणि कर्णधार विराट कोहलीचे पुन्हा एकदा यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा सहाव्या एकदिवसीय सामन्यात 8 गडी राखून विजय मिळविला. या विजयामुळे भारताने सहा सामन्यांची मालिका 5-1 अशी जिंकली. 

शार्दूलला ठाकूरने 4 फलंदाजांना बाद केल्याने दक्षिण आफ्रिकेचा डाव 204 धावांवर संपला. त्यानंतर भन्नाट फॉर्ममधे असलेल्या कर्णधार विराट कोहलीने 35 वे एकदिवसीय शतक ठोकून भारताला 8 गडी राखूनचा विजय मिळवून दिला. 6 सामन्यांची मालिका भारतीय संघाने 5-1 फरकाने जिंकून संपूर्ण वर्चस्व सिद्ध केले. विराट कोहली सामन्याचा आणि मालिकेचा मानकरी ठरला. 

विजयाकरता पाठलाग करायची धावसंख्या भारतीय फलंदाजांच्या आवाक्‍याबाहेर कधीच नव्हती. गेल्या सामन्यातील शतकवीर रोहित शर्माला लुंगी एन्गिडीने बाद केले आणि शिखर धवनचा कडक फटका झेल म्हणून टिपला गेला. त्या सगळ्याचा काडीमात्र परिणाम विराट कोहलीवर झाला नाही. चालू मालिकेत 500पेक्षा जास्त धावांचा पाऊस पाडणाऱ्या विराटने प्रत्येक गोलंदाजाला अगदी सहजी तोंड दिले. खराब तर सोडाच चांगल्या चेंडूंनाही विराटने सीमारेषेबाहेर पिटाळले. 41 चेंडूत अर्धशतक करणाऱ्या विराटला 35 वे एकदिवसीय शतक शतक पूर्ण करायला 82 चेंडू लागले. 

अजिंक्‍य रहाणे सोबत अखंडित भागीदारी करून विराट कोहलीने भारताच भलामोठा विजय 33 व्या षटकात नक्की केला. विराट कोहली 129 आणि अजिंक्‍य रहाणे 34 धावांवर नाबाद राहिले. 

मालिका जिंकल्यानंतरही अखेरच्या सामन्यातही विजयाच्याच इराद्याने उतरण्याची देहबोली सहाव्या सामन्यांत भारतीय खेळाडूंनी दाखवली. आतापर्यंत फिरकीचा दरारा बघणाऱ्या दक्षिण आफ्रिकेला या सामन्यात शार्दुल ठाकूरची (4-52) दादागिरी सहन करावी लागली. संधी मिळताच शार्दुलने दाखवलेली चमक भारताची "बेंच स्ट्रेंग्थ'ही भक्कम असल्याची साक्ष देणारी होती. शादुर्लची भेदकता आणि युजवेंद्र, कुलदीपच्या फिरकीचा दरारा यामुळे भारताने दक्षिण आफ्रिकेचा डाव 46.5 षटकांत 204 धावांत रोखला.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news 6th ODI India beat South Africa by 8 wickets