सचिनच म्हणतो, अर्जुन पुढचा सचिन नाही

वृत्तसंस्था
Thursday, 8 February 2018

अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे, याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी माझी इच्छा आहे.

मुंबई - सहसा आपण एखाद्या प्रसिद्ध व्यक्तीचा वारसदारामध्येच त्याचेच गुण पाहून तो पुढे त्याच्यासारखाच होणार असे म्हणतो, पण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने मुलगा अर्जुन हा पुढील सचिन नसल्याचे स्पष्ट केले आहे.

सचिनने मुलगा अर्जुनच्या कारकिर्दीविषयी बोलताना म्हटले आहे, की अर्जुनने अाडनावाचे दडपण घेऊन आपली कारकिर्द घडवू नये. त्याने क्रिकेटमध्ये कारकिर्द करताना आपली स्वतंत्र शैली निर्माण करावी. त्याने आयुष्यात काय करावे, याबद्दल मी त्याला पूर्ण स्वातंत्र्य दिले आहे. फक्त त्याने सर्वोत्तम कामगिरी करावी, अशी माझी इच्छा आहे. त्याने अर्जुनच व्हावे, त्याची माझ्याशी तुलना होऊ नये. 

अर्जुनने यावर्षाच्या सुरवातीला ऑस्ट्रेलियामध्ये ब्रॅडमन ओव्हल संघाकडून खेळताना अष्टपैलू कामगिरी केली होती. त्याने 24 चेंडूत 48 धावा आणि चार बळी मिळविले होते. त्यानंतर त्याच्याकडे माध्यमांकडून भविष्यातील तेंडुलकर असे पाहिले जात होते. त्यामुळे सचिनने हे स्पष्टीकरण दिले आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Arjun is not the next Sachin says Sachin Tendulkar