चँपियन्स करंडक: भारत-पाकिस्तान पुन्हा लढणार?

टीम ई सकाळ
मंगळवार, 13 जून 2017

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या या विजयामुळे पुन्हा एकदा भारत पाक सामनाच्या अनुभव घेण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार का या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लढावे लागणार आहे. तर, भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

लंडन - चँपियन्स करंडक क्रिकेट स्पर्धा अंतिम टप्प्यावर आली असून, आता अंतिम फेरीत कोणते संघ खेळणार याबाबत अंदाज लावण्यात येत आहेत. पारंपारिक प्रतिस्पर्धी भारत आणि पाकिस्तान संघ उपांत्य फेरीत पोचले असून, या दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत विजय मिळविले तर अंतिम फेरीत यांच्यात लढत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

पाकिस्तानने श्रीलंकेविरुद्ध विजय मिळवत उपांत्य फेरीत प्रवेश केला. पाकिस्तानच्या या विजयामुळे पुन्हा एकदा भारत पाक सामनाच्या अनुभव घेण्याची संधी क्रिकेट रसिकांना मिळणार का या बाबत उत्सुकता निर्माण झाली आहे. पाकिस्तानला उपांत्य फेरीत इंग्लंडविरुद्ध लढावे लागणार आहे. तर, भारताचा सामना बांगलादेशशी होणार आहे.

'अ' गटातून इंग्लंड आणि बांगलादेश, तर 'ब' गटातून भारत आणि पाकिस्तान हे संघ उपांत्यफेरीत दाखल झाले आहेत. चॅंपियन्स करंडक स्पर्धेचा पहिला उपांत्य सामना इंग्लंड आणि पाकिस्तान यांच्यात 14 जूनला कार्डीफ येथे होणार आहे. दुसरा उपांत्य सामना भारत आणि बांगलादेश यांच्यात 15 जूनला बर्मिंगहॅमला येथे होईल. 

इंग्लंड संघाची कामगिरी पाहता पाकिस्तानला वरचढ ठरण्याची फार कमी संधी आहे. मात्र पाकिस्तानचा संघ अत्यंत बिनभरवशाचा असल्याने पहिल्या उपांत्य सामन्याचा अंदाज लावणे कठीण आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या सामन्यात दमदार खेळ करत बांगलादेशने उपांत्यफेरीत प्रवेश मिळवला. बांगलादेशने पहिल्यांदाच चँपियन्स करंडक स्पर्धेत उपांत्यफेरीत प्रवेश केला आहे. अशावेळी बांगलादेशवर निश्‍चितच दडपण असेल. उत्तम कामगिरी करत असणाऱ्या भारताविरुद्ध जिंकण्यासाठी बांगलादेशला या दडपणावर मात करुन सांघिक खेळ करावा लागेल. 

बुधवारी होणाऱ्या सामन्यात पाकिस्तानने जर इंग्लंडला हरवले तर क्रिकेट रसिकांना भारत पाक अंतिम सामना होण्याचे वेध लागतील यात काहीच शंका नाही. 2007 च्या टी-20 विश्‍वकरंडकानंतर भारत पाक एकदाही अंतिम सामन्यात समोरासमोर आलेले नाहीत, त्यामुळेच चँपियन्स करंडक स्पर्धेतील उपांत्यफेरीतील सामन्यांचे निकाल काय लागतात, याकडे क्रिकेटप्रेमींचे लक्ष असेल. 

ई सकाळवरील ताज्या बातम्यांसाठी क्लिक करा -
दहावीचा निकाल 88.74%; मुलींचीच बाजी, कोकण विभाग अव्वल
गुजरातमध्ये स्मृती इराणींच्या दिशेने फेकल्या बांगड्या
शेतीविकासासाठी गरज ‘मर्दा’ची
'होय, मी फक्‍त शेतकरीच आहे'...!
#स्पर्धापरीक्षा - 'झिरो डिफेक्ट झिरो इफेक्ट' योजना​
धुळे: लोकसहभागातून घटबारी धरणाचे काम प्रगतीपथावर​
डोंगरावर फुलविले आमराईचे नंदनवन​
आई-वडिलांच्या प्रश्‍नाला कंटाळून विद्यार्थिनीची आत्महत्या​
श्रीलंकेच्या चुकांमुळे पाक उपांत्य फेरीत​

Web Title: Cricket news ICC Champions Trophy 2017: India face Pakistan in final