भारतीय संघाचा टी-20 मालिकेतही विजय

वृत्तसंस्था
Sunday, 25 February 2018

आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते. शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती. ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल केल्या. 19व्या षटकात बुमराकडून 16 धावा गेल्या.

केपटाऊन : भारताच्या पुरुष संघाने दक्षिण आफ्रिका दौऱ्यात वन-डेपाठोपाठ टी-20 क्रिकेट मालिकासुद्धा जिंकली. निर्णायक तिसरा सामना भारताने सात धावांनी जिंकला. 

आफ्रिकेसमोर 173 धावांचे आव्हान होते. शेवटच्या 18 चेंडूंत 53 धावांची गरज होती. ख्रिस्तीयन जॉंकरने 18व्या षटकात शार्दुल ठाकूरकडून 18 धावा वसूल केल्या. 19व्या षटकात बुमराकडून 16 धावा गेल्या. शेवटच्या षटकात 18 धावांची गरज होती. भुवनेश्वरकडून एक वाईड पडला, पण आफ्रिकेला एका चौकारासह 11 धावाच काढता आल्या. अखेरच्या चेंडूवर जॉंकर बाद झाला. 

संक्षिप्त धावफलक :
भारत 20 षटकात 7 बाद 172 (शिखर धवन 47, सुरेश रैना 43, हार्दिक पांड्या 21) वि. वि. दक्षिण आफ्रिका ः 20 षटकांत 6 बाद 165 (डेव्हिड मिलर 24, जेपी ड्युमिनी 55-41 चेंडू, 2 चौकार, 3 षटकार, ख्रिस्तीयन जॉंकर 49-24 चेंडू, 5 चौकार, 2 षटकार, फरहान बेहर्डीन नाबाद 15, भुवनेश्वर 4-0-24-2, बुमरा 1-39, शार्दुल 1-35, पंड्या 4-0-22-1, रैना 1-27) 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news India beat South Africa by 7 runs seal T20I series