विराट, धोनी, भुवनेश्वर, बुमराहला विश्रांती; रोहित कर्णधार

वृत्तसंस्था
Sunday, 25 February 2018

संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रिषभ पंत.

नवी दिल्ली - श्रीलंका, बांगलादेश आणि भारत यांच्यात होणाऱ्या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेसाठी आज (रविवार) भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. विराट कोहली, महेंद्रसिंह धोनी, भुवनेश्वर कुमार आणि जसप्रीत बुमराह यांना या मालिकेसाठी विश्रांती देण्यात आली आहे.

निवड समितीने या तिरंगी ट्वेंटी-20 मालिकेसाठी 15 सदस्यीय संघाची घोषणा केली. दक्षिण आफ्रिकेचा दौरा संपल्यानंतर प्रमुख खेळाडूंना विश्रांती देण्याचा निर्णय समितीकडून घेण्यात आला. मार्चमध्ये ही मालिका होणार असून, श्रीलंकेत ही मालिका खेळविली जाणार आहे. दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, विजय शंकर, मोहम्मद सिराज या खेळाडूंसह यष्टीरक्षक म्हणून रिषभ पंत यालाही संघात स्थान देण्यात आले आहे.

संघ पुढीलप्रमाणे : रोहित शर्मा (कर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, मनीष पांडे, दिनेश कार्तिक, दीपक हुड्डा, वॉशिंग्टन सुंदर, युजवेंद्र चहल, अक्षर पटेल, विजय शंकर, शार्दुल ठाकूर, जयदेव उनाडकट, मोहम्मद सिराज, रिषभ पंत.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Indian team selected for triseries in Sri Lanka