कोलकता नाईट रायडर्सच्या कर्णधारपदी दिनेश कार्तिक

वृत्तसंस्था
Sunday, 4 March 2018

कोलकता संघाचे आतापर्यंतचे कर्णधार -

  • सौरव गांगुली (2008 ते 2010) - 27 सामने 13 विजय, 14 पराभव
  • ब्रँडन मॅक्कलम (2009-2009) - 13 सामने 3 विजय, 9 पराभव, 1 अनिर्णित
  • गौतम गंभीर (2011-2017) - 122 सामने 69 विजय, 51 पराभव, 1 अनिर्णित
  • जॅक कॅलिस (2011-2011) - 2 सामने 1 विजय, 1 पराभव
  • दिनेश कार्तिक (2018) 

कोलकता : आयपीएलच्या अकराव्या मोसमाला लवकरच सुरवात होत असून, कोलकता नाईट रायडर्सने आपल्या संघाच्या कर्णधारपदी यष्टीरक्षक दिनेश कार्तिकची निवड केली आहे.

भारतीय संघात पुनरागमन केलेल्या दिनेश कार्तिकची कामगिरी गेल्या काही सामन्यांमध्ये चांगली झालेली आहे. याच कामगिरीच्या जोरावर त्याला कोलकता संघाचे कर्णधारपद मिळाले आहे. यापूर्वीच्या मोसमात कोलकता संघाचे कर्णधारपद गौतम गंभीरकडे होते.

कोलकता संघात यंदा कोणताही प्रसिद्ध क्रिकेटपटू नसल्याने दिनेश कार्तिक, रॉबिन उथप्पा, सुनील नरेन यांच्यात कर्णधारपदासाठी स्पर्धा होती. यामध्ये दिनेश कार्तिकने बाजी मारली. रॉबिन उथप्पाकडे उपकर्णधारपद देण्यात आले आहे. आयपीएलच्या नव्या मोसमाला 7 एप्रिलपासून सुरवात होणार आहे.

कोलकता संघाचे आतापर्यंतचे कर्णधार -

  • सौरव गांगुली (2008 ते 2010) - 27 सामने 13 विजय, 14 पराभव
  • ब्रँडन मॅक्कलम (2009-2009) - 13 सामने 3 विजय, 9 पराभव, 1 अनिर्णित
  • गौतम गंभीर (2011-2017) - 122 सामने 69 विजय, 51 पराभव, 1 अनिर्णित
  • जॅक कॅलिस (2011-2011) - 2 सामने 1 विजय, 1 पराभव
  • दिनेश कार्तिक (2018) 

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news IPL news kolkata knight riders appoint Dinesh Karthik as captain