रबाडावरील कारवाई मागे; तिसऱ्या कसोटीत खेळणार

वृत्तसंस्था
Tuesday, 20 March 2018

दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला होता. शिस्तभंगाच्या कारवाईला रबाडाने आव्हान दिले होते. त्यावर न्यूझीलंडच्या न्यायिक आयोगाचे प्रमुख मायकेल हेरॉन टेलिकॉन्फरन्सद्वारे सुनावणी करत त्याच्यावर टाकण्यात आलेली दोन सामन्यांची बंदी मागे घेण्यात आली.

जोहान्सबर्ग : दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कगिसो रबाडा याच्यावर करण्यात आलेल्या शिस्तभंग कारवाईविरोधात दक्षिण आफ्रिका मंडळाने अपील केल्यानंतर त्याच्यावरील कारवाई मागे घेण्यात आली आहे. तसेच तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातही खेळणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

दक्षिण आफ्रिका संघाने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी क्रिकेट सामन्यासाठी कगिसो रबाडाचा संघात समावेश केला होता. शिस्तभंगाच्या कारवाईला रबाडाने आव्हान दिले होते. त्यावर न्यूझीलंडच्या न्यायिक आयोगाचे प्रमुख मायकेल हेरॉन टेलिकॉन्फरन्सद्वारे सुनावणी करत त्याच्यावर टाकण्यात आलेली दोन सामन्यांची बंदी मागे घेण्यात आली. तिसरा कसोटी सामना गुरुवारी (ता. 22) सुरू होणार आहे. 

एकाच सामन्यात दोन वेळा आचारसंहितेचा भंग केल्याचे आरोप रबाडावर करण्यात आला होता. दुसऱ्या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ बाद झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. याबरोबरच सामन्याचे मानधन 50 टक्के कपात करण्याची रक्कमही 25 टक्के करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे, की या प्रकरणी कगिसो रबाडा दोषी आढळलेला नाही. त्यामुळे त्याच्यावरील बंदी मागे घेण्यात येत आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Kagiso Rabada South Africa pace bowler's ban reduced after appeal