न्यूझीलंडचा सहज विजय; मालिका बरोबरीत 

वृत्तसंस्था
Saturday, 4 November 2017

दिल्ली आणि आजचा राजकोट येथील सामना एकमेकांना पुरक होते, पहिल्या सामन्यात भारताने द्विशतकी मजल मारली आणि न्यूझीलंडला हरवले. आजही असेच घडले मात्र संघ बदलले होते. प्रथम फलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचे न्यूझीलंडने सोने केले.

राजकोट : खेळपट्टी फलंदाजीस उपयुक्त असली तरी दडपणाखाली कोणताही संघ कोलमडू शकतो याचे उदाहरण राजकोटमध्ये दिसून आले. न्यूझीलंडचे भलेमोठे आव्हान भारताला पेलवले नाही आणि भारताचा 40 धावांनी पराभव झाला. न्यूझीलंडच्या विजयामुळे तीन सामन्यांची मालिका 1-1 अशा बरोबरीत आली. कॉलीन मुन्रोचे तडाखेबंद शतक या सामन्याचे वैशिष्ठ ठरले. 

दिल्ली आणि आजचा राजकोट येथील सामना एकमेकांना पुरक होते, पहिल्या सामन्यात भारताने द्विशतकी मजल मारली आणि न्यूझीलंडला हरवले. आजही असेच घडले मात्र संघ बदलले होते. प्रथम फलंदाजी करण्याच्या मिळालेल्या संधीचे न्यूझीलंडने सोने केले. पदार्पण करणारा महम्मद सिराज आणि फिरकी गोलंदाजांवर तुफानी हल्ला करणाऱ्या मुन्रोने 58 चेंडूतच 7 चौकार आणि सात षटकारांचा प्रहार करत नाबाद 109 धावांची खेळी केली आणि मार्टिन गुप्तिलसह 105 धावांची सलामी दिली. तेथेच न्यूझीलंड द्विशतकापर्यंत मजल मारणार हे निश्‍चित झाले होते. 

गेल्या सामन्यात शिखर धवन आणि रोहित शर्मा यांनी शतकी सलामी देत भारताच्या विजयाचा पाया रचला होता आज तेवढ्याच मोठ्या धावसंखेचा पाठलाग करताना अशा भक्कम सलामीची गरज होती, परंतु ट्रेंट बोल्डने एकाच षटकांत या दोघांना बाद करून भारतीय संघाचे नटबोल्ट घट्ट केले. त्यानंतर श्रेयस अय्यरने काही प्रमाणात हे फासे उलघडण्याचा प्रयत्न केला, परंतु 4 बाद 67 अशा अवस्थेनंतर सर्व काही कठिण होत गेले. अखेर भारत विजयापासून दूर राहिला.

संक्षिप्त धावफलक 
न्यूझीलंड ः 20 षटकांत 2 बाद 196 (मार्टिन गुप्तिल 45 -41 चेंडू, 3 चौकार, 3 षटकार, कॉलिन मुन्रो नाबाद 109 -58 चेंडू, 7 चौकार, 7 षटकार, महम्मद सिराज 4-0-58-1, चाहल 3-0-36-1) वि. वि. भारत 20 षटकांत 7 बाद 155 (विराट कोहली 65, ट्रेट बोल्ट 4-34)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news New Zealand beat India in second T-20