यामुळेच मी पाहू शकलो नाही कार्तिकचा षटकार: रोहित

वृत्तसंस्था
Monday, 19 March 2018

दिनेश कार्तिकला आतापर्यंत खूप संधी मिळालेल्या नाहीत. मात्र, आता त्याने केलेली कामगिरी आनंददायक होती. मला कायम आमच्या फलंदाजांवर विश्वास होता आणि आम्ही ही धावसंख्या पार करू असे वाटत होते.

कोलंबो - तिरंगी टी-20 मालिकेत बांगलादेशविरुद्धच्या अंतिम सामन्यात दिनेश कार्तिकने मारलेला अखेरचा षटकार का पाहू शकलो नाही, याचा खुलासा कर्णधार रोहित शर्माने केला आहे.

भारताने बांगलादेशवर चार गडी राखून विजय मिळविल्यानंतर बोलताना रोहित शर्माने याबाबतचे गुपीत उघडले. रोहितने म्हटले आहे, की मला वाटते होते, 1 चेंडूत 5 धावांची गरज असताना सामना सुपर ओव्हरमध्ये जाईल. त्यामुळे मी अखेरचा चेंडू न बघता ड्रेसिंग रुममध्ये पॅड घालण्यासाठी गेले होतो. अन् कार्तिकने अखेरचा चेंडूवर मारलेल्या षटकाराचा साक्षीदार नाही होऊ शकलो.

दिनेश कार्तिकला आतापर्यंत खूप संधी मिळालेल्या नाहीत. मात्र, आता त्याने केलेली कामगिरी आनंददायक होती. मला कायम आमच्या फलंदाजांवर विश्वास होता आणि आम्ही ही धावसंख्या पार करू असे वाटत होते, असे रोहित शर्माने सांगितले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Rohit Sharma miss Dinesh Karthik six off last ball against bangladesh