सेहवागमध्ये चांगल्या अंपायरची क्षमता: सायमन टॉफेल

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 21 March 2018

आमची आई तुमची आई आणि 12 हिंदी शब्दांचा वापर
सायमनने त्यांच्या लेक्चरची सुरुवात नमस्ते या शब्दाने केली. संपूर्ण लेक्चरमध्ये त्याने सुमारे 14 हिंदी शब्द वापरले. त्यात नमस्ते, खुबसुरत लडकी, मुंबई बहोत गरम, ठंडा, साला-चुतिया, धन्यवाद शुक्रिया असे शब्द होते. तर 'आमची आई तुमची आई वीर माता जीजाबाई' या व्हिजेटीआयमधील घोषणाही मुलांबरोबर बोलून दाखवली. ऑस्ट्रेलियनना फास्ट बोलण्याची सवय असते मी फास्ट बोलू लागलो तर सांगा. माझा अॅक्सेण्ट बररोबर आहे असा प्रश्न विचारुन त्यांनी लेक्चरला सुरुवात केली.  

मुंबई : भारताला चांगला अंपायरची गरज आहे. खेळणारा अंपायर असेल तर उत्तम. मुंबईतल्या व्हिजेटीआय कॅम्पसमध्ये आयोजित लेक्चरमध्ये सायमन टॉफेल यांनी हे मत व्यक्त केले.

टेक्नॉवॅन्झा या फेस्टिवलमध्ये आयोजित लेक्चरमध्ये बोलताना त्यांनी स्वत:ची कारकिर्द, त्यात आलेले अनुभव आणि क्रिकेट विश्वातील काही आठवणी सांगत मुलांना मार्गदर्शन केले.

भारताला चांगल्या अंपायरची आवश्यकता आहे आणि वीरेंद्र सेहवागला अंपायरिंग करताना माझ्या उजव्या बाजूला उभं असलेले पहायला आवडेल असे सायमन म्हणाला. सेहवाग हा खुप चांगला खेळाडू आहे. मी अंपायरिंगचा निर्णय हा पैसा, स्त्रिया आणि मानसन्मानासाठी घेतला नाही तर मला चांगलं अंपायर व्हायचंच होतं म्हणून घेतला आहे. पाठीचं दुखण हे आणखीन एक कारण असल्याचं त्याने यावेळी सांगितलं. अंपायर होण्यासाठी जास्त फोकस असावं लागतं. पैशासाठी नोकरीचा विचार करत असाल तर तो विचार थांबवा असा उपदेशही त्यांनी यावेळी केला.

कसं बोलायचं, कसं वागायचं, कसं काम करायचं हे अंपायरिंग किंवा इंजिनिअरिंग नाही तर, जगण्याचं कौशल्य आहे. मी बेस्ट अंपायर झालो त्याला 10 वर्ष लागली. एस. रवी आणि काही अंपायरची उदाहरणं देत त्याने यशस्वी होण्यासाठी संयम लागतो जो आजच्या पिढीकडे नाही असं मत मांडले. पराभवात डगमगू नका काम करत रहा असा सल्ला दिला. माझ्या वेळेच्या बेस्ट अंपायरकडे बघायचो. अंपायर होणं म्हणजे त्याग. घर, कुटूंबला सोडून दौरे करावे लागतात. निसर्ग, खाणं राहण या सर्वात तडजोड करावी लागते. त्यासाठी तयार असलं पाहिजे.

वेस्ट इंडिज हे क्रिकेट खेळासाठी खुप चांगलं ठिकाण आहे. भारतात आणि मुंबईत खुप उकडतं अनेकदा त्याचा त्रास झाल्याचे त्याने सांगितले. श्रीलंकेत झालेल्या हल्ल्यावेळी दुर्दैवी घटना घडू नये असं वाटत होतं ते क्रिकेटसाठी. त्यावेळी गाडीत लपतानाही मा माझी अंपायरिंगची हॅट चुरगळू नये म्हणून प्रयत्न करत होतो. तो अनुभव जगणं बदलणारा होता अशा पद्धतीने अनुभव आणि त्यातून घेतलेला बोध सांगून त्याने मुलांना चांगलंच खिळवून ठेवलं होतं. 

भारतात आई-वडिलांना खुप सन्मान दिला जातो. भारतीय संस्कृतीतील ही बाब मला आवडते. इथले लोक उत्साही, हुशार ध्येयवेडे आहेत. 

बेस्ट अंपायर नको
आयसीसीमध्ये बेस्ट अम्पायर हा पुरस्कार का नाही दिला या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी सांगितलं क्रिकेट हा खेळाडूंचा खेळ आहे. खेळांडूनां चांगले पैसे मिळाले पाहिजेत. 

टेक्नॉलॉजीचा बॅलन्स केला पाहिजे
क्रिकेटमध्ये आलेलं तंत्रज्ञान चांगलं आहे. अंपायरिंग करताना त्याची मदत होतेच. पण यात समतोल साधता आला पाहिजे. टेक्नॉलॉजीशिवाय अम्पायरिंग करण्याची कला अवगत असली पाहिजे.

आमची आई तुमची आई आणि 12 हिंदी शब्दांचा वापर
सायमनने त्यांच्या लेक्चरची सुरुवात नमस्ते या शब्दाने केली. संपूर्ण लेक्चरमध्ये त्याने सुमारे 14 हिंदी शब्द वापरले. त्यात नमस्ते, खुबसुरत लडकी, मुंबई बहोत गरम, ठंडा, साला-चुतिया, धन्यवाद शुक्रिया असे शब्द होते. तर 'आमची आई तुमची आई वीर माता जीजाबाई' या व्हिजेटीआयमधील घोषणाही मुलांबरोबर बोलून दाखवली. ऑस्ट्रेलियनना फास्ट बोलण्याची सवय असते मी फास्ट बोलू लागलो तर सांगा. माझा अॅक्सेण्ट बररोबर आहे असा प्रश्न विचारुन त्यांनी लेक्चरला सुरुवात केली.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Simon Taufel statement on Virendra Sehwag umpiring