esakal | प्रदूषणाच्या तक्रारीनंतर आता लकमलला मैदानात उलट्या
sakal

बोलून बातमी शोधा

Suranga Lakmal

श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांना प्रदूषणाचा जास्त त्रास झाला आणि त्यांना श्वास घ्यायला कठीण जात दिसले. इतकेच नाहीतर सुरंगा लकमल ला उलट्या झाल्याचे कानावर आले. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करू लागला तेंव्हा थोडी गोलंदाजी केल्यावर लकमलचा पाय कोटला मैदानावरच्या छोट्या खड्ड्यात फिरला आणि तोच आत गेला.

प्रदूषणाच्या तक्रारीनंतर आता लकमलला मैदानात उलट्या

sakal_logo
By
सुनंदन लेले

नवी दिल्ली - दिल्ली कसोटी सामना क्रिकेट इतकाच प्रदूषणाच्या चर्चेने गाजतो आहे. सामान्यांच्या दुसऱ्या दिवशी दिल्लीतील प्रदूषणाचा प्रश्नाला वाचा फुटली. सामन्याच्या चौथ्या दिवशी चर्चा वाढते आहे. एकीकडे दिल्लीतील ग्रीन ट्रिब्युनल बोर्डाने दिल्ली क्रिकेट संघटनेला, "आत्ताच्या घडीला दिल्लीमध्ये सामना भरवलाच का", अशी विचारणा केली. कोलंबोमध्ये प्रदूषणाचा आकडा ३६ दाखवत असताना दिल्लीमध्ये तोच एकदा भयावह ३०६ चा दिसत होता. म्हणून श्रीलंकन खेळाडूंनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशीपासून खास करून फिल्डिंग करताना तोंडाला मास्क लावणे पसंत केले . यामागे त्रिशतकाकडे वाटचाल करणाऱ्या विराट कोहलीची फलंदाजीची लय तोडायची योजना होती हे मान्य केले तरी प्रदूषणाचा मुद्दा खोटा नव्हता. 

श्रीलंकेच्या वेगवान गोलंदाजांना प्रदूषणाचा जास्त त्रास झाला आणि त्यांना श्वास घ्यायला कठीण जात दिसले. इतकेच नाहीतर सुरंगा लकमल ला उलट्या झाल्याचे कानावर आले. भारतीय संघ दुसऱ्या डावात फलंदाजी करू लागला तेंव्हा थोडी गोलंदाजी केल्यावर लकमलचा पाय कोटला मैदानावरच्या छोट्या खड्ड्यात फिरला आणि तोच आत गेला. काही काळाने लकमल मैदानात आला आणि त्याने काही गोलंदाजीपण केली. नंतर तो परत आत गेला कारण त्याला उलट्या झाल्या असे समजले. 

दिल्लीतील प्रदूषणाने उग्र रूप धारण केल्याचा फटका खेळाडूंना सहन करावा लागला आहे. भारतीय संघाने कोणताही गाजावाजा न करता सामना खेळाला असला तरी प्रदूषणाच्या समस्येचे कारण मागे ठेवले जाऊ शकत नाही. डिसेंबर जानेवारी महिन्यात दिल्लीमध्ये खेळाचे मोठे सामने आयोजित करायलाच नाही पाहिजेत ह्या विचारावर सगळे ठाम आहेत. 

loading image