सुरेश रैनाचे भारतीय संघात पुनरागमन

वृत्तसंस्था
Sunday, 28 January 2018

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनडकट, शार्दुल ठाकूर.

मुंबई - दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या ट्वेंटी-20 मालिकेसाठी मधल्या फळीतील फलंदाज सुरेश रैनाने भारतीय संघात पुनरागमन केले आहे.

cricket news Suresh Raina Returns as India Squad for South Africa T20Is

भारतीय संघाला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर कसोटी मालिकेत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. दक्षिण आफ्रिकेने तीन सामन्यांची कसोटी मालिका 2-1 अशी जिंकली आहे. आता एकदिवसीय मालिका होणार असून, त्यानंतर ट्वेंटी-20 मालिका होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून भारतीय संघाबाहेर असलेल्या रैनाला स्थानिक स्पर्धांतील उत्कृष्ठ कामगिरीमुळे संघात पुनरागमनाची संधी मिळाली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वाखालील 16 सदस्यीय संघाची घोषणा करण्यात आली आहे.

भारतीय संघात रैनाच्या पुनरागमनाव्यतिरिक्त इतर बदल करण्यात आलेले नाहीत. अक्षर पटेल, युजवेंद्र चहल आणि कुलदीप यादव या तीन फिरकीपटूंना संधी देण्यात आली आहे. तर, वेगवान गोलंदाजीची मदार भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनडकट, शार्दुल ठाकूर यांच्यावर असणार आहे.

संघ पुढीलप्रमाणे : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, के. एल. राहुल, सुरेश रैना, महेंद्रसिंह धोनी (यष्टीरक्षक), दिनेश कार्तिक, हार्दिक पांड्या, मनीष पांडे, अक्षर पटेल, युजवेंद्र चहल, कुलदीप यादव, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, जयदेव उनडकट, शार्दुल ठाकूर.

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Suresh Raina Returns as India Squad for South Africa T20Is