विनोद कांबळीने धरले सचिनचे पाय

वृत्तसंस्था
Thursday, 22 March 2018

मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरणावेळी विनोद कांबळीने सचिनचे पाय धरले. त्यावेळी सचिनने त्याला हात देत गळाभेट घेतली. ट्रम्प नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट आणि शिवाजी पार्क लायन्स यांच्यात अंतिम सामना झाला.

मुंबई : तरुण वयात मुंबईच्या क्रिकेट मैदानावर धावांचा पाऊस पाडणाऱ्या विनोद कांबळी आणि सचिन तेंडुलकरची मैत्री सर्वांना परिचीत आहेच, पण आता चक्क विनोद कांबळीने गंमतीत सचिन तेंडुलकरचे पाय धरल्याचे समोर आले आहे.

मुंबई टी-20 क्रिकेट स्पर्धेत अंतिम सामन्यानंतर बक्षिस वितरणावेळी विनोद कांबळीने सचिनचे पाय धरले. त्यावेळी सचिनने त्याला हात देत गळाभेट घेतली. ट्रम्प नाईट मुंबई नॉर्थ ईस्ट आणि शिवाजी पार्क लायन्स यांच्यात अंतिम सामना झाला. या सामन्यात शिवाजी पार्क लायन्सला तीन धावांनी पराभव स्वीकारावा लागला. विनोद कांबळी या संघाचा मेन्टॉर होता. 

सामना संपल्यानंतर विजेत्या व उपविजेत्या संघाला पदक प्रदान करण्यात आली. बक्षिस वितरण समारंभाला सचिन तेंडुलकर व सुनील गावसकर उपस्थित होते. कांबळीला पदक देण्यासाठी बोलविल्यानंतर त्याने मंचावर येताच सचिनचे पाय धरले. त्यानंतर या शाळेतील दोस्तांची गळाभेटही झाली. गावसकर यांनीही सचिनलाच कांबळीला पदक देण्यास सांगितले. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cricket news Vinod Kambli touches Sachin Tendulkar feet during Mumbai T20 League final