esakal | छोट्या चुका मोठा भुर्दण्ड : विराट कोहली
sakal

बोलून बातमी शोधा

Virat Kohli

जसप्रीत बुमराच्या एका नो बॉलने भारतीय संघाच्या हातून चॅंम्पीयन्स ट्रॉफी निसटली होती. वॉंडरर्स मैदानावरील चौथ्या एक दिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बोल्ड केले तो नो बॉल होता. त्या नंतर मिलरने 4 चौकार 2षटकार मारून39 धावा केल्या. विकेट किपर क्‍लासेनने नाबाद 43 धावा करून विजयाला गवसणी घातली. दोघांनी मिळून केलेल्या वेगवान 72 धावांच्या भागीदारीने सामन्याचा चेहरा बदलला. 

छोट्या चुका मोठा भुर्दण्ड : विराट कोहली

sakal_logo
By
सुनंदन लेले

पोर्ट एलिझाबेथ : एकदिवसीय मालिका विजयाचे स्वप्न भारतीय संघाने स्वत:च्या हाताने वॉंडरर्सच्या मातीत मिळवले. चौथ्या एक दिवसीय सामन्यात संपूर्ण वर्चस्वाच्या स्थितीतून भारतीय संघाने सामना गमावला. क्षेत्ररक्षण आणि गोलंदाजी करताना केलेल्या चुकांचा मोठा भुर्दण्ड भारतीय संघाला भरावा लागला. 3 सलग पराभवानंतर भारताची विजयी मालिका खंडीत करताना चौथा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला. 

जसप्रीत बुमराच्या एका नो बॉलने भारतीय संघाच्या हातून चॅंम्पीयन्स ट्रॉफी निसटली होती. वॉंडरर्स मैदानावरील चौथ्या एक दिवसीय सामन्यात युजवेंद्र चहलने डेव्हिड मिलरला 6 धावांवर बोल्ड केले तो नो बॉल होता. त्या नंतर मिलरने 4 चौकार 2षटकार मारून39 धावा केल्या. विकेट किपर क्‍लासेनने नाबाद 43 धावा करून विजयाला गवसणी घातली. दोघांनी मिळून केलेल्या वेगवान 72 धावांच्या भागीदारीने सामन्याचा चेहरा बदलला. 

दक्षिण आफ्रिकेची फलंदाजी चालू झाल्यावर मार्करम आणि आमलाने विश्‍वासाने सुरुवात केली. दोघांनी मागे रेलत काही सुरेख फटके मारले. भागीदारी रंगू लागली असताना मार्करमला वेगाने आत येणाऱ्या चेंडूवर पायचित करून बुमराने पहिला धक्का दिला त्यावेळी 43 धावा फलकावर लागल्या होत्या. त्याच क्षणी पाऊस आला. पावणे दोन तासांचा खेळ पावसाच्या हजेरीने वाया गेल्यावर स्थानिक वेळ 8.30वाजता पंचांनी खेळ चालू केला. सामना 28 षटकांचा करून 202 धावा करायचे नवे आव्हान पक्के करण्यात आले. म्हणजेच दक्षिण आफ्रिकेला सामना जिंकायला उरलेल्या 124 चेंडूत 159 धावा करायला लागणार होत्या. 

आमला आणि ड्युमिनी पाठोपाठ बाद झाल्यावर डिव्हीलीयर्सने चहलला दोन षटकार मारत प्रेक्षकांना आशा दाखवली. पण पुढच्याच षटकात हार्दिक पंड्याला षटकार मारायच्या प्रयत्नात डिव्हिलीयर्स बाद झाला आणि यजमान संघाच्या विजयाच्या आशा पुसट झाल्या. त्यानंतर नाट्य घडले. चहलच्या एकाच षटकात डेव्हिड मिलर चांगलाच नशीबवान होता. एकदा त्याचा झेल श्रेयस अय्यरने सोडला नंतर तो बोल्ड झाला तो नो बॉल ठरला आणि फ्री हिटवरही त्याचा झेल पकडला गेला. 

त्यानंतर मिलरने बॅट तलवारी सारखी चालवली. क्‍लासेनसह 72 धावांची वेगवान भागीदारी नोंदवताना दोघा फलंदाजांनी प्रेक्षकांचे भरपूर मनोरंजन करणारे फटके मारले. चहलने मिलरला पायचित केले. क्‍लासेनने शांतपणे खेळून नाबाद 43 धावा करत 26व्या षटकात दक्षिण आफ्रिकेचा विजय हाती घेतला. फुलक्वायोने तीन लांब षटकार मारून विजयी धावा काढल्या. 

केलेले शतक वाया गेल्याने सामन्यानंतर बोलताना शिखर धवन काहीसा नाराज दिसला. "कॅच कोणी मुद्दामहून सोडत नाही की नो बॉल कोणी ठरवून टाकत नाही. खेळात अशा चुका होतात. दडपणाखाली चुका न करणे हेच तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे आव्हान असते. गेल्या तीन सामन्यात आपल्या फिरकी गोलंदाजांनीच सामने जिंकून दिले होते हे विसरायला नको. एका सामन्यातील काही चुकांनंतर त्यांना एकदम दूषणे द्यायला नकोत'', शिखर धवनने नाराजी लपवताना सांगितले. 

मालिका अजूनही बरोबरीत सोडवली जाऊ शकते हा विश्‍वास घेऊन दक्षिण आफ्रिकन संघाने पोर्ट एलिझाबेथचा प्रवास उत्साहाने केला.

loading image