लॉकडाऊनमध्येही 'हा' क्रिकेटपटू झालाय मालामाल; उत्पन्नाचे स्त्रोत वाचून तुम्हालाही आश्चर्य वाटेल...

सकाळ वृत्तसेवा
Friday, 5 June 2020

कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊनच्या बंदीत सर्व उद्योगधंदे बसले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, कॉस्ट कटिंग आणि पगारही कमी झाले; पण विराट कोहलीवर त्याचा परिणाम झाला नाही.

नवी दिल्ली ः कोरोनाच्या महामारीने लॉकडाऊनच्या बंदीत सर्व उद्योगधंदे बसले. अनेकांच्या नोकऱ्यांवर गदा आली, कॉस्ट कटिंग आणि पगारही कमी झाले; पण विराट कोहलीवर त्याचा परिणाम झाला नाही. उलट तिजोरीच भरली. इंस्टाग्रामवर पोस्टद्वारे सर्वाधिक कमाई करणाऱ्या जगभरातील खेळाडूंमध्ये विराट सहाव्या स्थानी आहे आणि एकमेव क्रिकेटपटूही आहे. 

वाचा ः यूपीएससी परीक्षांचे वेळापत्रक जाहीर; जाणून घ्या पूर्वपरीक्षेची तारीख...

नुकत्याच जाहीर झालेल्या फोर्ब्जच्या सर्वाधिक श्रीमंत खेळाडूंत एकमेव क्रिकेटपटू असलेला विराट सोशल मीडियावरही इतर कोणत्याही क्रिकेटपटूंच्या तुलनेत सर्वाधिक फॉलोअर्स असलेला खेळाडू आहे. इंस्टाग्रामवरील सर्वाधिक कमाई करणाऱ्या खेळाडूंत पोर्तुगिजच्या ख्रिस्तियानो रोनाल्डोने पहिला क्रमांक मिळवताना त्याने पारंपरिक प्रतिस्पर्धी लिओनेल मेस्सीला पाठीमागे टाकले आहे. 

वाचा ः 'सकाळ'च्या बातमीचा इम्पॅक्ट; एसटीतील 'त्या' अधिकाऱ्यांची मुदतवाढ मंत्र्यांनी नाकारली...

इंस्टाग्रामवरील खेळाडूंच्या कमाईबाबत प्रसिद्धी झालेल्या आकडेवारीनुसार, विराट कोहली त्याच्या स्पॉन्सर्स कंपन्यांच्या पोस्टद्वारे जाहिरात करतो आणि त्यातून त्याने 3 लाख 79 हजार 294 पौंड (भारतीय रुपयांत 36 कोटी 23 लाख) कमावले आहेत. यातील प्रत्येक पोस्टसाठी तो 1 कोटी 29 लाख रुपये तो मिळवतो. 

वाचा ः योग्यवेळी उपचार मिळाल्याने गर्भवती महिलेचा वाचला जीव! सुप्रिया सुळेंच्या मध्यस्तीने यंत्रणा तत्काळ हलली

सर्वाधिक कमाई करणारा ख्रिस्तियानो रोनार्लोडने 18 लाख 82 हजार 336 पौंड कमावले आहेत. चार स्पॉन्सर्सकडील एका पोस्टद्वारे तो 4 लाख 70 हजार 584 पौंड मिळवतो. रोनाल्डोनंतर लिओने मेस्सी आणि नेमारचा क्रमांक लागतो. त्यांची कमाई अनुक्रमे 12 लाख आणि 11 लाख पौंड अशी आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: this cricket player becomes more rich even in lockdown