वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच उत्सुकता

पीटीआय
Wednesday, 24 October 2018

विशाखापट्टणम - कितीही धावांचे आव्हान दिले तरी भारताला हरविणे कठीण आहे, याची जाणीव झालेला वेस्ट इंडीजचा संघ गोलंदाजीत तरी कमजोर पडला आहे. रविवारच्या पराभवानंतर सावरण्याच्या आतच त्यांना उद्या दुसऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी तयार व्हायचे आहे. भारताच्या वर्चस्वापेक्षा विक्रमांचीच अधिक उत्सुकता असेल.

विशाखापट्टणमचे मैदान भारतीयांसाठी नेहमीच फलदायी ठरले आहे. याच मैदानावर उद्या भारत ९५० वा एकदिवसीय सामना खेळणार आहे. हा टप्पा महत्त्वाचा असेल.

या विक्रमाबरोबर कर्णधार विराट कोहलीही सर्वात वेगवान १० हजार एकदिवसीय धावांच्या विक्रमाच्या उंबरठ्यावर आहे. उद्या ८१ धावा केल्यास विराट सचिन तेंडुलकरचाच हा विक्रम मोडू शकेल. सचिनने ही मजल २५९ सामन्यांत मारली होती; तर कोहली आतापर्यंत २०४ सामनेच खेळलेला आहे.

सर्वाधिक एकदिवसीय सामने 
देश                 सामने      विजय      हार    विजयाची सरासरी

भारत               ९४९      ४९०       ४११       ५४.३४
ऑस्ट्रेलिया         ९१६      ५५६       ३१७     ६३.६४
पाकिस्तान          ८९९      ४७६       ३९७       ५४.४८
श्रीलंका             ८२७      ३७८       ४०७      ४८.१६
वेस्ट इंडीज         ७८१      ३८६       ३५९      ५१.७९       

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket Record