World Cup 2019 : शिखर धवनचे खणखणीत शतक; भारत सुस्थितीत

वृत्तसंस्था
Sunday, 9 June 2019

शिखर धवनने 95 चेंडूंमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 17 वे शतक केले. हे शतक साजरे करताना त्याने 13 चौकार ठोकले.

वर्ल्ड कप 2019 : लंडन : विश्वकरंडकातील पहिल्याच सामन्यात रोहित शर्माला सूर गवसला. आता गरज होती ती फक्त गब्बर शिखर धवनला फॉर्म सापडण्याची. हे दोघे सलामीवीर सुसाट सुटले की भारताला मोठी धावसंख्या उभारण्यापासून कोणीही अडवू शकत नाही. आज नेमके झाले तेच. शिखर धवनने ऑस्ट्रेलियाविरुद्ध खणखणीत शतक झळकाविले.

शिखर धवनला फक्त एका सामन्यात चांगला खेळ करण्याची गरज असते. त्यानंतर तो सुसाट सुटतो. आजच्या सामन्यातही तेच झाले. सुरवातीपासूनच त्याने ऑसी गोलंदाजांवर वर्चस्व गाजवत चौफेर फटकेबाजी केली आणि आपले शतक साजरे केले. 

त्याने  95 चेंडूंमध्ये एकदिवसीय क्रिकेटमधील 17 वे शतक केले. हे शतक साजरे करताना त्याने 13 चौकार ठोकले.
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricket World Cup 2019 Match in London Dhawan Slams 17th Ton