ब्रॅड हॉग करणार होता आत्महत्या 

वृत्तसंस्था
मंगळवार, 1 नोव्हेंबर 2016

ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 07 विश्‍व करंडक संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या हॉगने नंतर स्वतःला सावरले व पुनरागमन केले. पुनरागमनानंतर त्याने 123 एकदिवसीय सामन्यात 156 बळी मिळविले.

सिडनी : निवृत्ती आणि विवाहात आलेल्या अपयशातील नैराश्‍यामुळे आपण आत्महत्येचा विचार केला होता, असा खुलासा ऑस्ट्रेलियाचा फिरकीपटू ब्रॅड हॉगने केला आहे. 

"दी रॉंग अन' या आपल्या आत्मचरित्रात हॉगने हा खुलासा केला आहे. आत्महत्येचा विचार कसा आला, त्यासाठी आपण कसा प्रयत्न केला, याविषयीचे विस्तृत वर्णन हॉगने या पुस्तकात केले आहे. पत्नी आंद्रियासोबतचे संबंध टिकवून ठेवण्यासाठी हॉगने 2007-08 मध्ये सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती स्वीकारली होती. त्यानंतरही त्याला अपयश आले. निवृत्ती, पत्नी सोडून गेली, अशा परिस्थितीत आपण दारूच्या आहारी गेलो. त्यामुळे 2010 मध्ये आत्महत्येचा प्रयत्न केला, असे हॉगने म्हटले आहे. 

ऑस्ट्रेलियाच्या 2003 व 07 विश्‍व करंडक संघातील प्रमुख खेळाडू असलेल्या हॉगने नंतर स्वतःला सावरले व पुनरागमन केले. पुनरागमनानंतर त्याने 123 एकदिवसीय सामन्यात 156 बळी मिळविले. गेल्या वर्षी आयपीएलमध्ये तो वयाच्या 44 वर्षी कोलकाता नाईट रायडर्सकडून खेळला होता. यामुळे आयपीएलमध्ये खेळणारा सर्वांत वयस्कर क्रिकेटपटू ठरला होता. तो सध्या बिग बाशमध्ये मेलबर्न रेनेगेड्‌सकडून खेळत आहे.

Web Title: Cricketer Brad Hogg was in depression, reveals his book