महंमद शमी अपघातात जखमी; डोक्याला दुखापत

वृत्तसंस्था
रविवार, 25 मार्च 2018

डेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये सध्या तो सराव करत आहे. आयपीएलपूर्वी गेल्या दोन आठवड्यांपासून तो येथे आहे. सराव पूर्ण करून आज सकाळी तो दिल्लीला परतत होता. शमीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप घडामोडी घडल्यानंतर आता त्याला अपघातालाही सामोरे जावे लागले आहे.

डेहराडून : भारतीय क्रिकेट संघातील वेगवान गोलंदाज महंमद शमीच्या मोटारीला आज (रविवार) सकाळी डेहराडूनजवळ अपघात झाला. या अपघातात त्याच्या डोक्याला दुखापत झाल्याचे समजते.

सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डेहराडूनहून दिल्लीला येत असताना शमीच्या कारला ट्रकने जोरदार धडक दिली. या अपघातातून तो बचावला असून, त्याच्या डोक्याला दुखापत झाली आहे. त्याच्या डोक्याला 10 टाके पडल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या तो डेहराडूनमध्येच असून, तेथे त्याला डॉक्टरांनी विश्रांतीचा सल्ला दिला आहे.

डेहराडूनमधील अभिमन्यू क्रिकेट अकादमीमध्ये सध्या तो सराव करत आहे. आयपीएलपूर्वी गेल्या दोन आठवड्यांपासून तो येथे आहे. सराव पूर्ण करून आज सकाळी तो दिल्लीला परतत होता. शमीच्या वैयक्तिक आयुष्यात खूप घडामोडी घडल्यानंतर आता त्याला अपघातालाही सामोरे जावे लागले आहे. बीसीसीआयने नुकतेच त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची परवानगी दिली होती.

Web Title: cricketer Mohammed Shami injured in road accident