ऑस्ट्रेलियाला भारताची धास्ती; स्मिथ, वॉर्नरची बंदी उठवण्यासाठी हालचाली

वृत्तसंस्था
Tuesday, 30 October 2018

भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी कमालीची खालावली आहे. त्यांना पाकिस्तानकडून कसोटी आणि ट्वेंटी20 दोन्ही मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अशातच विराटसेनेचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना पुन्हा संघात आणण्यासाठी हालचाल करण्यास सुरवात केली आहे. 

मेलबर्न : भारतीय संघ सध्या तुफान फॉर्ममध्ये असल्याने आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यात त्यांच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. अशातच ऑस्ट्रेलिया संघाची कामगिरी कमालीची खालावली आहे. त्यांना पाकिस्तानकडून कसोटी आणि ट्वेंटी20 दोन्ही मालिकांमध्ये पराभव स्वीकारावा लागला. अशातच विराटसेनेचा सामना करण्यासाठी ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने माजी कर्णधार स्टीव्ह स्मिथ आणि डेव्हिड वॉर्नर यांना पुन्हा संघात आणण्यासाठी हालचाल करण्यास सुरवात केली आहे. 

चेंडू कुरतडण्याप्रकरणी दोषी असलेल्या स्टीव्ह स्मिथ, डेव्हीड वॉर्नर आणि कॅमेरून बँक्रॉफ्ट यांची शिक्षा रद्द करावी अशी विनंती ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेने केली आहे. 

भारताविरुद्धच्या मालिकेतील त्यांची संघाला गरज आहे हे लक्षात आल्याने त्यांनी पुन्हा संघात आणण्यासाठी प्रयत्न सुरु केले आहेत. ''या तिघांना त्यांच्या चुकीची पुरेशी शिक्षा मिळालेली आहे. त्यांच्यावरील बंदी आता रद्द करायला हवी,'' असे मत ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघटनेचे अध्यक्ष ग्रेग डायर यांनी व्यक्त केले. 

''खेळाडूंनी यापूर्वीच देशासाठी खेळण्याच्या बऱ्याच संधी गमावल्या आहेत. त्यांनी अपमान आणि लोकांच्या टीकेचाही सामना केला आहे. तसेच त्यांना आर्थिक भुर्दंडही बसला. त्यांना केलेल्या चुकीचा पश्चाताप होत आहे. त्यामुळे त्यांना आता खेळू द्या,'' अशी विनंती डायर यांनी केली आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Cricketers union calls for Smith and Warner bans to be lifted immediately