'धोनी शिकणार नवी भाषा'

वृत्तसंस्था
Sunday, 5 August 2018

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच तामिळ ही भाषासुद्धा शिकणार आहे. काल एका सामन्याच्यावेळी नाणेफेक करत असताना त्याने त्याच्या तामिळ चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे. नाणेफेक करताना त्याने तामिळ भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मी जेंव्हा पण आयपीएल खेळतो त्यावेळी चेन्नईकडून खेळत असताना तमिळ शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मी परत एकदा तमिळ शिकण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि मला आशा आहे की, मी पुढच्या आईपीलच्या सामन्यांपर्यंत तमिळ नक्की शिकेल.

चेन्नई- भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी लवकरच तामिळ ही भाषासुद्धा शिकणार आहे. काल एका सामन्याच्यावेळी नाणेफेक करत असताना त्याने त्याच्या तामिळ चाहत्यांना असे आश्वासन दिले आहे. नाणेफेक करताना त्याने तामिळ भाषेत बोलण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याने मी जेंव्हा पण आयपीएल खेळतो त्यावेळी चेन्नईकडून खेळत असताना तमिळ शिकण्याचा प्रयत्न करत असतो. मी परत एकदा तमिळ शिकण्यासाठी प्रयत्न करतो आहे आणि मला आशा आहे की, मी पुढच्या आईपीलच्या सामन्यांपर्यंत तमिळ नक्की शिकेल.

दरम्यान, सध्या भारत आणि इंग्लंड कसोटी मालिका चालू असताना भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी आराम करत आहे. धोनी या दिवसामध्ये आपल्या चाहत्यांना भेटण्यासाठी वेळ देत आहे. यादरम्यान, धोनी काल तिरुनलवेलीतील भारतीय सिमेंट कंपनीच्या मैदानावर पोहोचला. तेथे त्याला पाहून चाहत्यांना प्रचंड आश्चर्याचा धक्का बसला होता. यावेळी मदुरा पँथर्स आणि कोवई किंग्सच्या दरम्यान सामना चालू होता. या सामन्यात धोनीने नाणेफेकही केली. 

धोनी आणि चेन्नईचे खुप चांगले नाते आहे. आयपीलमध्येही धोनी चेन्नईकडूनच खेळतो. त्यामुळे एक वेगळ्याच प्रकारचे संबध तमिळ लोकांसोबत जुळले असल्याने त्याची तमिळ भाषा शिकण्याची इच्छा आहे.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: CSK Captain MS Dhoni Promises to Improve Tamil for Next IPL