स्टिव्ह स्मिथ विचित्र कर्णधार : वॉर्नर

वृत्तसंस्था
शनिवार, 24 डिसेंबर 2016

मेलबर्न : सलग दोन कसोटी सामने जिंकल्यानंतरही ऑस्ट्रेलिया संघ आणि कर्णधार स्टिव्ह स्मिथ यांना टीकेचे धनी होण्याची वेळ आली आहे. क्रिकेट तज्ज्ञ आणि चाहतेच नाहीत, तर आता थेट उपकर्णधार डेव्हिड वॉर्नरनेही यात उडी घेतली असून, स्मिथ एक विचित्र कर्णधार असल्याचे त्याने म्हटले आहे.

पाकिस्तानला विजयासाठी 490 धावांचे आव्हान देऊनही ऑस्ट्रेलियाला केवळ 39 धावांनी विजयावर समाधान मानावे लागले होते. मोठा विजय मिळविण्यात अपयश आल्यामुळेच विजयानंतरही स्मिथला टीकेचा रोष सहन करावा लागत आहे.

पहिल्या डावात पाकिस्तान 287 धावांनी पिछाडीवर असतानाही त्यांना फॉलो ऑन न देण्याच्या निर्णयापासून ते दुसऱ्या डावातील क्षेत्ररचना आणि गोलंदाजीतील बदल या सर्वांमध्ये स्मिथने असंख्य चुका केल्या, असेच सर्वांचे म्हणणे आहे.

दुसऱ्या कसोटी क्रिकेटच्या पार्श्‍वभूमीवर पत्रकारांशी बोलताना वॉर्नर म्हणाला, ''स्मिथचे निर्णय विचित्र होते. त्याच्याकडे नियोजनच नव्हते. व्यूहरचनादेखील चुकीची होती. नॅथन लियॉनचा वापरही त्याने अत्यंत चुकीच्या पद्धतीने केला. एकवेळ सामना हातातून निसटल्यासारखे वाटत होते. विजय मिळाला म्हणून बचावलो.''

वॉर्नरने या वेळी पाकिस्तानच्या जिगरबाज प्रवृत्तीचे तोंडभरून कौतुक केले. तो म्हणाला, ''मोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना त्यांच्याकडे नियोजन होते. त्यांनी त्यांची खेळी केली. ते विजयाच्या स्थितीत कधीच नव्हते. पण, त्यांनी सामना पाचव्या दिवसापर्यंत नेला. विजयाची स्थिती निर्माण केली. या पराभवातूनही त्यांना आत्मविश्‍वास मिळाला असेल, असे वाटेल.''

विजयानंतरही होत असलेल्या टीकेमुळे आता दुसऱ्या कसोटी सामन्यासाठी ऑस्ट्रेलिया संघात बदल अपेक्षित मानले जात आहेत. फलंदाज निक मॅडिन्सन याच्या जागी अष्टपैलू हिल्टन कार्टराईट याला संधी मिळण्याची शक्‍यता नाकारता येत नाही.

सर्व परिस्थिती आणि घडलेल्या घटना या तज्ज्ञांच्या समोर आहेत. निर्णय त्यांनीच घ्यायचा आहे. सर्व बाजूंनी छाननी करून ते निर्णय घेतील. त्यांचा निर्णय आम्हाला बंधनकारक असेल.
- डेव्हिड वॉर्नर, ऑस्ट्रेलियाचा उपकर्णधार

Web Title: David Warner criticises Australia Captain Steve Smith