दिवस-रात्र कसोटी कार्यक्रमातून वगळली

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 9 May 2018

सिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील.

सिडनी - भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दिवस-रात्र कसोटी खेळण्यास ठाम विरोध केल्यानंतर क्रिकेट ऑस्ट्रेलियालादेखील नमते घ्यावे लागले. भारताच्या आगामी दौऱ्याच्या कार्यक्रमातून त्यांनी आता दिवस-रात्र कसोटी सामना वगळला आहे. सर्व सामने दिवसाच खेळविले जातील.

भारताच्या आगामी ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील ॲडलेड येथे होणारा पहिलाच कसोटी सामना क्रिकेट ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र ठरवला होता. क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य जेम्स सदरलॅंड म्हणाले, ‘‘दिवस-रात्र सामना खेळण्यासाठी आम्हाला पुरेशी तयारी करायला हवी, असे कारण ‘बीसीसीआय’ने दिले आहे. त्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही आता हा सामना दिवसाच खेळविण्याचा निर्णय घेतला आहे.’’

श्रीलंकेशी खेळणार
क्रिकेट ऑस्ट्रेलियादेखील दिवस-रात्र खेळण्याचा हट्ट सोडायला तयार नाही. त्यांनी आता पुढील वर्षी जानेवारीत श्रीलंकेविरुद्ध ब्रिस्बेनला दिवस-रात्र कसोटी खेळण्याचा निर्णय घेतला आहे. ‘कसोटी क्रिकेटचा प्रसार वाढविण्यासाटी दरवर्षीच्या मोसमात एक तरी कसोटी दिवस-रात्र खेळायचा आमचा मनोदय आहे. त्यासाठी आता आम्ही श्रीलंकेविरुद्ध खेळू, असे सदरलॅंड यांनी स्पष्ट केले. 

टीम पेनीच कर्णधार
स्मिथवरील बंदीच्या कारवाईनंतर कर्णधार नियुक्त करण्यात आलेल्या टीम पेनीवरच नवे प्रशिक्षक जस्टिन लॅंगर यांनी विश्‍वास दाखवला आहे. इंग्लंडविरुद्धच्या पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेसाठी त्यांनी पेनी याचीच कर्णधार म्हणून निवड केली. त्याचवेळी टी-२० साठी ॲरॉन फिंच याला कर्णधार करण्यात आले आहे. संघ ः टीम पेनी (कर्णधार), ॲरॉन फिंच, ॲश्‍टन ॲगर, ॲलेक्‍स कॅरे, जोश हेझलवूड, ट्राविस हेड, नॅथन लियॉन, ग्लेन मॅक्‍सवेल, शॉन मार्श, हिये रिचर्डसन, केन रिचर्डसन, डीआर्सी शॉर्ट, बिली स्टॅनलेक, मार्क्‌स स्टोईनिस, अँड्रयू टाय.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Day Night Test Cricket match